कोकण

चिपळूणमध्ये दंत आरोग्य शिबिर

CD

चिपळूणमध्ये
दंत आरोग्य शिबिर
चिपळूण ः शिवसेना उपशहरप्रमुख कपिल शिर्के यांच्या पुढाकाराने आणि योगिता दंत महाविद्यालय, खेड यांच्या सहकार्याने चिपळूण शहरात प्रभातरोड येथे दंत आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्‍घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. शिबिरात योगिता दंत महाविद्यालय खेड येथील डॉ. इंद्रजित देशमुख, डॉ. श्रीनाथ कुलकर्णी व इतर तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची मोफत दंत तपासणी केली. रॉयलनगर व प्रभातरोड फाउंडेशन यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, उपशहरप्रमुख कपिल शिर्के, राणी महाडिक, भाजपचे शशिकांत मोदी, राम शिंदे, परिमल भोसले, विनोद कदम, संदीप भिसे, महेश कांबळी, प्रभातरोड फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश काटकर, उपाध्यक्ष सुमती जांभेकर, सेक्रेटरी संतोष इनामदार, सहसेक्रेटरी धनश्री जोशी, विश्वस्त शर्मिला मोरे, प्रमोद लाड, बाळशेठ परांजपे, प्रकाश देशमुख, शुभांगी काणे, राजेश पल्लोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राजेंद्र खांबे यांची
उपाध्यक्षपदी निवड
सावर्डे ः संगमेश्वर तालुक्यातील श्रीमती क. पां. मुळ्ये हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोळंबे येथील राजेंद्र खांबे यांची महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. राज्य हिंदी अध्यापक महामंडळाची सभा सातारा येथील हिंदी भवनात पार पडली. या सभेत राज्याची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. त्या कार्यकारिणीमध्ये खांबेची उपाध्यक्षपदी निवड झाली. राजेंद्र खांबे हे अतिशय अभ्यासू व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. ते कोळंबे येथे गेली २८ वर्षे हिंदी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २००४ पासून त्यांनी हिंदीच्या प्रचार-प्रसाराचे काम सुरू केले. ते संगमेश्वर तालुका हिंदी शिक्षक मंडळाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून त्यांनी संगमेश्वर तालुका व रत्नागिरी जिल्ह्यात हिंदी विषयासाठी खूप मेहनत घेतली आहे. ते जिल्हा मंडळावर कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. खांबे हे स्काऊट गाईड विभागाचे कमिशनर आहेत. स्काऊट गाईड विभागासाठी त्यांनी १९९९ पासून काम करताना अनेक प्रशिक्षण शिबिरात शिक्षकांना मार्गदर्शनाचे काम केले.


अल्पसंख्याक
उपाध्यक्षपदी तांबे
खेड : शिवसेना जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्षपदी अब्दल्ला तांबे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भरणे येथील शिवसेना कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ते भरणे मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आहेत. याप्रसंगी उद्योजक शमीम तांबे, शफी तांबे, जिल्हाध्यक्ष सिकंदर जसनाईक, तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT