-rat२६p३.jpg-
P२५N७३२५२
रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास दिनानिमित्त गुरूवारी संस्कृत उपकेंद्रात बोलताना डॉ. दिनकर मराठे.
---
कविकुलगुरू कालिदास हे साहित्य क्षेत्राचे मेरूमणी
डॉ. दिनकर मराठे ः रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात कालिदास दिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : संस्कृत भाषा व संस्कृत साहित्य यांची व्याप्ती मोठी आहे; मात्र संस्कृत क्षेत्रातील प्रतिभावंत साहित्यिक व महाकवी कालिदास यांनी स्वत:च्या प्रतिभेच्या जोरावर वाचकांच्या मनावर मोहिनी घातली. कविकुलगुरू कालिदास साहित्यक्षेत्राचे मेरूमणी आहेत. त्यामुळेच आधुनिक काळातही महाकवी कालिदासाच्या साहित्याचा संस्कृतप्रेमी आणि साहित्याचे वाचक आस्वाद घेत आहेत, असे गौरवोद्गार भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी काढले.
संस्कृत उपकेंद्रात महाकवी कालिदास दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संचालक डॉ. मराठे म्हणाले की, आजचा दिवस खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. संस्कृत कवींमध्ये महाकवी कालिदास सर्व श्रेष्ठ आहेत. विश्वविद्यालयाचे नावदेखील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे विश्वविद्यालय हे नागपूरमधील रामगिरी पर्वताच्या पायथ्याला असणाऱ्या रामटेक परिसरात आहे. याच रामगिरी पर्वतावर महाकवी कालिदास यांनी अजरामर खंडकाव्य मेघदूत रचले.
महाकवी कालिदास यांच्या अभिज्ञानशाकुन्तलम् आणि मेघदूत या साहित्य कृतीतील निवडक महत्वाच्या श्लोकांचे सामूहिक पठण करण्यात आले. श्लोकांमधील लेखन वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आली. या निमित्ताने लघुपट दाखवण्यात आला.
---
आजही अभ्यास, संशोधन
महाकवी कालिदास हे उपमा अलंकारासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या मालविकाग्निमित्र, अभिज्ञानशाकुन्तलम्, विक्रमोर्वशीयम् ही तीन नाटके रघुवंश, कुमारसंभव ही दोन महाकाव्ये, मेघदूत खंडकाव्य व ऋतुसंहार हे निसर्गवर्णनपर काव्य या सात साहित्यकृती प्रसिद्ध आहेत. आजही या सात साहित्यकृतींवर सतत अभ्यास व संशोधन सुरू आहे, असे या वेळी डॉ. मराठे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.