74009
भटकी कुत्री, पाळीव प्राण्यांपासून जपा!
‘वर्ल्डवाईड वेटेरीनरी’ ः बांदा पीएमश्री केंद्रशाळेत ‘रेबीज मिशन’
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २९ ः संसर्गजन्य समजल्या जाणाऱ्या रेबीज रोगाबाबत पीएमश्री बांदा क्र. १ केंद्रशाळेत शाळा व्यवस्थापन समिती व वर्ल्डवाईड वेटेरीनरी सर्व्हिस यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मार्गदर्शन वर्गात रेबीज मिशनबाबत अमित नाईक व वसंत तावडे यांनी विद्यार्थ्यांना पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी, प्राण्यांना होणारे विविध आजार, रेबीज रोगाचा प्रसार कसा होतो तसेच कुत्रा चावल्यानंतर जखम झाल्यास कोणती काळजी घ्यावी, रेबीज रोगावरील औषधोपचार याबाबत माहिती सांगितली. एखाद्या वेळी भटका कुत्रा अंगावर धावून येत असेल तर कशी काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक दाखवून ते विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले.
सध्या बांदा गावात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ही एक गंभीर बाब आहे. शाळेच्या परिसरात देखील ही कुत्री वावरत असतात. एक कुत्र्याने शाळकरी मुलाचा चावा घेतल्याची घटनाही घडली होती. त्याला शिक्षक आणि ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने बांदा रुग्णालयात नेले. पुढील उपचारासाठी सावंतवाडी शासकीय रुग्णालयात शिक्षक वर्ग स्वतः घेऊन गेले. शाळा परिसरातील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शाळेतर्फे बांदा ग्रामपंचायत व पोलिस ठाण्यांना दिली. मुख्याध्यापक शांताराम असनकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हेमंत मोर्ये, संतोष बांदेकर, पालक संदीप वायंगणकर, रावबहद्दूर मौर्या आदी उपस्थित होते. उपशिक्षक जे. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत मोर्ये यांनी आभार मानले.
---
भटक्या कुत्र्यांना ‘अँटी रेबीज’ देणार
ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मिशन रेबीजमार्फत बांदा गावातील सर्व शाळांच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीज इंजेक्शन व नसबंदीकरण करून बांदा गाव सिंधुदुर्गातील शंभर टक्के भटक्या कुत्र्यांची नसबंदीकरण केलेले पहिले गाव करण्यात येईल. यासाठी मिशन रिलीजमार्फत आवश्यक सर्व वैद्यकीय मदत देण्याचा मानस अमित नाईक यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.