कोकण

विद्यार्थ्यांनी कर्तव्य व जबाबदारीची जाणीव ठेवावी

CD

विद्यार्थ्यांनो जबाबदारीची जाणीव ठेवा
हेमंत भागवत ः ब्राह्मण समाजातील गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः विद्यार्थ्यांनी आपल्या अधिकारांबरोबरच कर्तव्य व जबाबदारीची जाणीव ठेवावी. विद्यार्थ्यांना नवनवीन अनेक संधी निर्माण होत आहेत. त्याचा सदूपयोग विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांनी ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात केले.
ब्राह्मण सहाय्यक संघ, चिपळूणतर्फे शहर परिसरातील विविध शाळा-महाविद्यालयातील दहावी व बारावी परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळविणाऱ्या ब्राह्मण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. गुणगौरव कार्यक्रमात दहावीतील युनायटेड इंग्लिश स्कूलमधील सुमेध आंबेकर, कुणाल शेंबेकर, वेदांत खरे, साकेत पाटणकर, सृष्टी गोंधळेकर, गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल, चिपळूणमधील ऋषिकेश लेले, ओम कुलकर्णी, वेदांग कुलकर्णी, मेरी माता हायस्कूल खेर्डी मधील गौरांग भागवत, आर्यन महंती, आर्या पोटे, जान्हवी मुरुगकर, आर. सी. काळे विद्यालय पेढे-परशुराममधील आर्या रिसबूड, बांदल हायस्कूलमधील यशोदीप मोहरीर, शौर्य शुक्ल, एस. पी. एम. परशुराममधील कौमुदी चितळे, क्षिप्रा पटवर्धन, ध्रुव जोशी, मधुरा निमकर, राज वागळे, ख्रिस्त ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलमधील राहुल शेणवी, सती इंग्लिश स्कूल, सतीमधील आर्या बापट यांचा सत्कार करण्यात आला. बारावीतील डीबीजे महाविद्यालयातील शास्त्र शाखेतील साक्षी बापट, शारदा दांडेकर, प्रेरणा पांडे, वाणिज्य शाखेतील भूमिका शर्मा, ओंकार कान्हेरे, मनीष शर्मा, कला शाखेतील वनश्री गानू, आर्या पुरोहित, सारंगी म्हसकर, गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलमधील शास्त्र शाखेतील निखिल पाटणकर, आर्या जुवेकर, तेजस पटवर्धन, आर. सी. काळे विद्यालय पेढे-परशुराममधील शिवमकुमार दुबे यांचा सत्कार करण्यात आला. (कै.) सुरेश श्रीकृष्ण केतकर विशेष पारितोषिक सुमेध गजानन आंबेकर या विद्यार्थ्यांला देण्यात आले.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT