swt12.jpg
74384
सावंतवाडीः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आयोजित विद्यार्थी परिषद सोहळ्यास उपस्थित मान्यवर.
‘स्टेपिंग स्टोन’ स्कूलमध्ये
विद्यार्थी परिषदेची स्थापना
पदग्रहण उत्साहातः सावंतवाडी गटशिक्षणाधिकाऱ्यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये नवनियुक्त विद्यार्थी परिषदेची स्थापना व पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. या कार्यक्रमाला शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांची मुख्य उपस्थिती होती. शाळेचे संचालक रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर, समन्वयक सुषमा पालव व पालक वर्ग आदी उपस्थिती होते.
सहशिक्षिका निधी सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. संचालक पाटणकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे कल्पना बोडके यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्वागतगीताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. बोडके यांच्यासह पालक प्रतिनिधी पुंडलिक दळवी, विद्यार्थी प्रमुख तनिष्क पवार व विद्यार्थिनी प्रमुख स्पृहा आरोंदेकर उपस्थित होते. यानंतर विद्यार्थी नवनियुक्त परिषदेतील सदस्यांची निवडणूक प्रक्रिया कशाप्रकारे पार पडली, याची पीपीटी सादर करण्यात आली. नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधी तनिष्क पवार व प्रमुख विद्यार्थिनी स्पृहा आरोंदेकर यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये अग्निहाऊसचा कप्तान भुवन दळवी व उपकप्तान वरद राणे, पृथ्वी हाऊसचा कप्तान नील सावंत व उपकप्तान सई नाईक, जल हाऊसची कप्तान आरोही सावंत व उपकप्तान रुद्र मालवणकर, वायू हाऊसचा कप्तान देवांग सारंग व उपकप्तान वरद सावंत या सर्व नियुक्त विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रिफेक्ट विद्यार्थ्यांमध्ये साईना अळवणी, प्रत्युषा घोगळे, भूमी नानोस्कर, अवनी शेर्लेकर, हेरंभ नाटेकर, कॅलव्हर्ट फर्नांडिस यांना बॅजेस व स्कार्फ प्रदान करण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी बोडके यांनी शाळेच्या संस्थापनाचे कौतुक केले. ग्रिष्मा सावंत यांनी आभार मानले. अमृता सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.