कोकण

कुडाळ हायस्कूल समोर नगरपंचायतीकडून रंबलर्स

CD

swt14.jpg
74386
कुडाळ ः बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांच्या तत्परतेमुळे रंबलर्स पट्टे बसविण्यात आले.

कुडाळ हायस्कूल समोर
नगरपंचायतीकडून रंबलर्स
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ः कुडाळ हायस्कूल समोर अपघात टाळण्यासाठी रंबलर्स पट्टे मारावेत, अशा सूचना काही दिवसांपूर्वी बांधकाम सभापती यांनी कुडाळ नगरपंचायतीला केली होती. त्याची तत्काळ दखल घेऊन आज रंबलर पट्टे बसविण्यात आल्याने सभापती मांजरेकर यांचे पालकवर्गाने आभार मानले.
कुडाळ हायस्कूल आणि पडतेवाडी प्राथमिक शाळेजवळ वाहनांची वर्दळ असते. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. याची दखल घेत मांजरेकर यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून रंबलर्स पट्टे मारण्याची सूचना नगरपंचायतीला दिली होती. त्याबाबत पाठपुरावाही केला होता. आज बसवलेल्या या रंबलर पट्ट्यांमुळे वाहनांचा कमी होणार असून त्यामुळे अपघाताची शक्यता कमी झाली आहे.

swt15.jpg
74387
अतुल बंगे

स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांचा
सहानुभूतीपूर्वक विचार करा
अतुल बंगेः महावितरणला आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ः स्मार्ट प्रीपेड मीटर बसवू नये, यासाठी आंदोलने केली तरीही चोरून मीटर बसवल्याने चारशे रुपये बिलांऐवजी चार हजार बिले येत आहेत. वीज ग्राहक ही बिले भरूच शकत नाहीत, याकडे ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत शासनाने ग्राहकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर बसवू नये, यासाठी मोठे आंदोलन माजी आमदार आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. यावेळी वीज मंडळ अधिकारी यांनी हे मीटर बसविले जाणार नाहीत, असे लेखी पत्र दिले होते; मात्र सध्या गावागावात वीज मीटर बदलून स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जात आहेत. गावातील ग्राहकांनी विरोध केला तरी दबावाखाली वीजमीटर बसविले जात आहेत, असा आरोप बंगे यांनी केला आहे. शासनाने सर्वसामान्य ग्राहकांचा विचार करून स्मार्ट प्रीपेड बसविण्यात येऊ नये, अशी मागणी बंगे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT