कोकण

विजय कामतांची निःस्वार्थी सेवा प्रेरक

CD

swt117.jpg
74519
मालवणः विजय कामत यांना पुरस्कार प्रदान करताना लक्ष्मण वळंजू व अन्य मान्यवर.

विजय कामतांची निःस्वार्थी सेवा प्रेरक
लक्ष्मण वळंजूः मालवणात ‘शैक्षणिक कार्य पुरस्कार’ प्रदान सोहळा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ : गेल्या अनेक वर्षांपासून टोपीवाला हायस्कूलरुपी या ज्ञानवृक्षाचे परिपालन करण्याची मोठी जबाबदारी विजय कामत सांभाळत आहेत. त्यांच्या निःस्वार्थी सेवेमुळे गेल्या १०-१२ वर्षांत या ज्ञानवृक्षाच्या शाखांचा विस्तार झाला आहे आणि त्याला बहर आला आहे. त्यामुळेच ते या शैक्षणिक कार्य पुरस्काराचे खऱ्या अर्थाने मानकरी ठरले आहेत, असे प्रतिपादन टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू यांनी केले.
यावेळी मालवण एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह विजय कामत यांना शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ परुळेकर स्मृती आणि मुख्याध्यापक बाबुराव परुळेकर स्मृती शैक्षणिक कार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कुडाळदेशकर गौडब्राह्मण सहयोग डोंबिवली यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ''शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ परुळेकर स्मृती आणि मुख्याध्यापक बाबुराव परुळेकर स्मृती शैक्षणिक कार्य पुरस्काराच्या सोहळ्याच्या निमित्ताने टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहात एक अभिनंदन सोहळा पार पडला. हा कार्यक्रम मालवण एज्युकेशन सोसायटी आणि टोपीवाला परिवारातर्फे आयोजित करण्यात आला. रामभाऊ परुळेकर आणि बाबुराव परुळेकर हे टोपीवाला हायस्कूलचे कर्तृत्ववान माजी मुख्याध्यापक होते. त्यांच्या समृद्ध इतिहासाची ओळख मालवण एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार दिगंबर सामंत यांनी करून दिली.
या सोहळ्यात मालवण एज्युकेशन सोसायटी आणि टोपीवाला परिवारातर्फे विजय कामत यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सुनीता कामत यांचाही साडी-ओटी भरून सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक वळंजू यांनी कामत यांना ‘कार्याग्रणी सन्मानपत्र’ प्रदान करून त्यांचा गौरव केला. सूत्रसंचालन ज्योती तोरसकर यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन शिक्षक चंद्रशेखर बर्वे यांनी केले. देविदास वेरलकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मालवण एज्युकेशन सोसायटीच्या घुर्ये प्री-प्रायमरी स्कूल, जयगणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा, अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कूल, ना. अ. देसाई टोपीवाला ज्युनियर कॉलेज आणि काळे आजींची बालवाडी अशा सर्व विभागांचे शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि इतर स्टाफ उपस्थित होता. याशिवाय मालवण एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष शैलेश खांडाळेकर, सदस्य लक्ष्मीकांत खोबरेकर, टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT