
Ganpati Miravnuk Controversy Kolhapur : गणेश आगमन मिरवणुकीत ‘भाई’चे गाणे घरासमोर का वाजवले? अशी विचारणा केल्याने पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराने तरुणावर बंदूक रोखल्याचा प्रकार पाचगाव रोडवरील बळवंत नगरात घडला. याप्रकरणी रणजित राजेंद्र गवळी (वय ४०), चेतन राजेंद्र गवळी (३६, दोघे रा. सहजीवन हाऊसिंग सोसायटी), अरुण संभाजी मोरे (रा. बापूरामनगर, कळंबा) यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. २०१८ मध्ये झालेल्या प्रतीक पोवार याच्या खुनाचीही वादाला किनार असल्याचे बोलले जात आहे.