कोकण

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला ११६ कोटींचा नफा

CD

swt122.jpg
KOP25N74530
सिंधुदुर्गनगरी ः येथील शरद कृषी भवनात जिल्हा बँकेची २०२४-२५ या आर्थिक वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी उपस्थित बँकेचे अधिकारी, पदाधिकारी व इतर मान्यवर.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला ११६ कोटींचा नफा
मनिष दळवीः सभासद संस्थांना देणार ११ टक्के लाभांश
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ः आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला ११६ कोटींचा आर्थिक नफा झाला आहे. त्यामुळे सभासद संस्थांना एकूण नफ्यातील ११ टक्के नफा लाभांश म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वार्षिक सभा सुरू असताना १४३८ सभासद संस्थांच्या खात्यावर ५ कोटी ६४ लाख ३८ हजार रुपये एवढा लाभांश थेट जमा केला आहे, अशी माहिती वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनात आज दुपारी २ वाजता २०२४-२५ या आर्थिक वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. श्री. दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांच्या मोठ्या उपस्थितीत झाली. यानंतर अध्यक्ष दळवी यांनी सभेची माहिती त्याच ठिकाणी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, प्रकाश मोर्ये, गजानन गावडे, विद्याप्रसाद बांदेकर, रवींद्र मडगावकर, समीर सावंत, विद्याधर परब, दिलीप रावराणे, व्हिक्टर डांटस, गणपत देसाई, निता राणे, आत्माराम ओटवणेकर, मेघनाथ धुरी, प्रकाश बोडस आदी उपस्थित होते.
श्री. दळवी यांनी, वार्षिक सभा १ जुलैला घेतल्याने महाराष्ट्रतील जिल्हा बँकांमध्ये सर्वात पहिली वार्षिक सभा घेण्याचा मान आमच्या बँकेला मिळाला असल्याचे सांगितले. यावेळी सर्व सभासदांची उपस्थिती होती. उपस्थित सभासदांनी संचालक मंडळाच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. सहा हजार कोटींचा टप्पा पार केल्याने खास अभिनंदन करण्यात आले. ८ टक्के दराने व्याज देत असल्याने ठेवीचा रेशो १२.१२ टक्केने वाढून हा रेशो महाराष्ट्रात सर्वाधिक राहिला आहे. यावेळी विकास संस्था सक्षम करण्याचा ठराव घेण्यात आला. यामध्ये दुग्ध विकास, मत्स्य विकास, गृहनिर्माण अशा सर्व प्रकारच्या संस्थांचा समावेश आहे. या संस्थांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय सुध्दा घेण्यात आला. वर्षभरातील सर्व आर्थिक पत्रकाना मंजुरी देण्यात आली. २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७ हजार कोटींचा टप्पा गाठण्याचे निश्चित करण्यात आले.
श्री. दळवी म्हणाले, ‘‘जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागणारी खते, बियाणे उपलब्ध करून देतानाच नवीन उद्योजक तयार करणे. शेतकरी उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, असे प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. गतवर्षी विविध नव उद्योजकांसाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले होते. यावर्षीही त्याच प्रमाणे नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी विकास संस्था, तालुका व जिल्हा खरेदी विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सहकार्यातून एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत. गतवर्षी सुमारे ४४ हजार ग्राहकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी डोअर स्टेप बँकिंग या सेवेचा फायदा घेतला आहे. त्यामुळे बँक सखी, प्रतिनिधींची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेने जिल्ह्यात नव उद्योजक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.’’
यावेळी बँक संचालक नितेश राणे मंत्री झाल्याने अभिनंदन ठराव घेण्यात आला, असे यावेळी श्री. दळवी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT