swt131.jpg
74652
वर्देः ग्रामपंचायत वर्दे येथे आयोजित कृषी दिन कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण करताना अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, प्रफुल्ल वालावलकर, महादेव पालव व इतर मान्यवर. (छायाचित्रः अजय सावंत)
शेतकऱ्यांनी समूह शेतीचा विचार करावा
डॉ. विजय दळवीः वर्देत कृषी दिनी वृक्षारोपण, भात पीक लागवडीचे धडे
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ः शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा विचार करणे आवश्यक आहे. जमीन ही जिवंत आहे, ती बोलते, झाडेही बोलतात. तुमची आवड-निवड बदला. काही समस्या जाणवल्यास जरुर या, कृषी विभागाकडून निश्चित मार्गदर्शन केले जाईल, असे प्रतिपादन उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी यांनी वर्दे येथे आयोजित कृषी दिन कार्यक्रमात केले. यावेळी एक काडी भातपिकाच्या लागवडीचे प्रात्यक्षिक तसेच ग्रामपंचायत आवारात वृक्ष लागवड करण्यात आली.
पंचायत समिती कुडाळ, कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत वर्दे यांच्यावतीने माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते (कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वर्दे ग्रामपंचायत हॉल येथे कृषी दिन कार्यक्रम झाला. यावेळी कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, वर्दे सरपंच महादेव पालव, उपसरपंच प्रदीप सावंत, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी बाळकृष्ण परब, निवृत्त प्राध्यापक शरद नाईक, कृषी अधिकारी श्रीमती चोरगे, विस्तार अधिकारी सौ. खरात आदी उपस्थित होते.
वर्दे जिल्हा परिषद शाळा ते ग्रामपंचायतीपर्यंत वृक्ष दिंडी काढण्यात आली. या दिंडीत विविध वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्या शाळकरी मुलांनी वृक्षारोपण करत वृक्ष संवर्धनाच्या घोषणा दिल्या. श्री. वालावलकर यांनी, आजच्या कृषी दिनी सामूहिक शेतीचा प्रयोग करावा, यासाठी आपले प्रयत्न आहेत. जेणेकरून हा प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली व शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिली. श्री. परब यांनी पारंपरिक व अपारंपरिक बियांबाबत माहिती देत समाजकल्याण व महाराष्ट्र ग्रामीण विकास योजनेची माहिती दिली. प्रा. नाईक यांनी, कृषी क्षेत्रात भरपूर पैसा आहे, चांगले आरोग्यही आहे; पण त्यासाठी वेळ देता आला पाहिजे, असे सांगत आपले अनुभव कथन केले. श्री.चोरगे यांनी, अन्नाच्या गुणवत्तेबाबत सर्वांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त करून शेती विषयी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी भोंगे, गायत्री तेली यांनी योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे निवेदन संदेश परब यांनी केले.
चौकट
कर्मचाऱ्यांचा सन्मान
कुडाळ तालुका भात पीक स्पर्धेत यश संपादन केलेल्या शेतकऱ्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते; मात्र विजेते शेतकरी संतोष गावडे, आनंद सावंत, रामचंद्र केसरकर उपस्थित न राहिल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला. कृषी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.