swt138.jpg
74661
खरारे-पेंडूर ः येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रात करिअर करावे
श्याम चव्हाण ः खरारे-पेंडूर ग्रामपंचायतीतर्फे कृषी दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २ : आज शेतीत अनेक बदल होत आहेत. लॉकडाऊनने शेतीचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण देखील शेतीकडे वळत आहेत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेमार्फत कृषी योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन सक्षम बनावे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी पेंडूर येथे केले.
माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पंचायत समिती मालवण व ग्रामपंचायत खरारे-पेंडूर यांच्यावतीने कृषी दिन-शेतकरी मेळावा ग्रामपंचायत खरारे-पेंडूर सभागृह येथे झाला. या मेळाव्याच्या पूर्वी न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर ते ग्रामपंचायत अशी वृक्ष दिंडी काढण्यात आली. तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, अमोल करंदीकर, अजिंक्य पाताडे, डॉ. तुषार वेर्लेकर, सरपंच नेहा परब, सुमित सावंत, डॉ. उत्तम फोंडेकर, विकास धामापूरकर, संजय माने, धनंजय गावडे, सुनील चव्हाण, आत्माराम परब, श्रीकृष्ण सावंत, राजेंद्र रणसिंग आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.