swt141.jpg
74670
फणसगाव : दिगंबर खराडे यांनी मार्गदर्शन केले.
योजनांमधून शाश्वत उत्पन्न वाढवा
दिगंबर खराडेः फणसगाव केंद्रशाळेत कृषी दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ : येथील पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय व ग्रामपंचायत फणसगाव यांच्यावतीने फणसगाव येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा पांडुरंग स्कूल या शाळेत कृषी दिन साजरा करण्यात आला. विविध कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शाश्वत उत्पन्न वाढवावे, असे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांनी केले.
मंचावर श्री. खराडे यांच्यासह फणसगाव सरपंच शीतल पाटील, रामेश्वर फळ संशोधन उपकेंद्राचे किटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील आदी उपस्थित होते. डॉ. मुंज यांनी, शेतीचे उत्पादन तसेच आंबा बागायतदारांचे उत्पादन वाढवण्यासाठी किटकनाशके व खतांचा सूक्ष्म नियोजन करून वापर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आरती पाटील यांनी, शेतकरी ओळखकार्ड काढण्याचे आवाहन केले. यावेळी कृषी विभागाच्या विविध योजना, भात लागवडीच्या विविध पद्धती, भातलागवड तंत्रज्ञान, फळबाग लागवड योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ड्रॅगन फ्रुटबाबत गोवळ गावचे प्रगतशील शेतकरी नासीर सोलकर यांनी मार्गदर्शन केले. भूषण नरसाळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्योती नारकर, दशरथ चव्हाण, अभिजित मदने, दीपक तेंडुलकर, लक्ष्मीकांत जोशी, विलास कोलते, अविनाश पाटील, विवेक नर, कृष्णकांत आडिवरेकर, सुजाता पेंडुरकर, अनुराधा नरसाळे, बी. एम. लांबाडे, मंगेश घनमोडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.