-rat२८p९.jpg-
२५N७३७६६
सावर्डे : रामपूर येथील शेतावर जय किसान गटाने केलेली चारसुत्री भातलागवड.
---
कृषिदुतांचे चारसुत्री लागवड प्रात्यक्षिक
रामपूर येथे आयोजन ; योजनांची दिली माहिती
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २ : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मांडकी-पालवण येथील कृषी महाविद्यालयातील जय किसान ग्रुपच्या कृषिदुतांनी रामपूर (पाथर्डी) येथे चारसुत्री पद्धतीने भात लागवडीचे यशस्वी प्रात्यक्षिक केले.
या कृषिदुतांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत अनिल रेडीज यांच्या भातशेतीत यशस्वी लावणी केली.
या प्रात्यक्षिकादरम्यान भात लागवडीसाठी गिरीपुष्प पाला आणि युरिया ब्रिकेटचा नियंत्रित वापर करण्यात आला. यासोबत भातशेती यांत्रिकीकरणाचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट केवळ नवीन लागवड पद्धती दाखवणे नव्हते तर शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांची माहिती देणे हे देखील होते. यामध्ये पीएम किसान योजना आणि कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या इतर योजनांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे, मंडल कृषी अधिकारी दत्तात्रय आवारे, उपकृषी अधिकारी दत्तात्रय काळे उपस्थित होते. जय किसान ग्रुपचे कृषिदूत वैभव पवळ, तेजस चोथे, उदयनराजे भोसले, मंगेश पिसे, विराज कणसे, भारतकुमार बिराजदार, प्रतीक माळी, तुषार भाबड, पुरूषोत्तम माळी, अमित माळी, ओंकार भापकर सहभागी झाले होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.