सुनील नारकर
74740
कोकण रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर
सावंतवाडीः सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. नारकर हे १९९७ पासून कोकण रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. कोकण रेल्वेमधील त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची आणि जबाबदारीची पदे भूषविली आहेत. रत्नागिरी येथे प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (आरटीएम) आणि मडगाव येथे वरिष्ठ प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (सीनियर आरटीएम) या पदांच्या जबाबदाऱ्या यापूर्वी त्यांच्याकडे होत्या. बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक (उपाध्यक्ष सीसीएम) पदाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना व्यावसायिक आणि जनसंपर्क क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे.
..................
swt22.jpg
74741
सावंतवाडी ः मोती तलावासमोर रस्त्यावर पडलेला खड्डा.
रस्त्यावर पडलेला
खड्डा बुजवणार कधी?
पालिकेचे दुर्लक्ष : अपघाताला आमंत्रण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः शहरातील मुख्य रस्त्यावर मधोमध भला मोठा खड्डा पडला असून याबाबत ''सकाळ''ने वृत्त प्रसिद्ध करूनही नगरपरिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा खड्डा अपघातांना आमंत्रण देत असून वाहनचालकांना मोठी हानी पोहोचवू शकतो. मोती तलाव येथील नारायण मंदिर शेजारी मुख्य रस्त्यावर मधोमध हा खड्डा आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता असून पावसाचे पाणी साचून त्या खड्ड्याचा अंदाज येत नाही. नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ तो बुजवावा, अशी मागणी केली जात आहे. गेले अनेक दिवस पडलेल्या या खड्ड्याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील खड्ड्याबाबत ''सकाळ''ने याआधीही वृत्त प्रसिद्ध करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते; मात्र प्रशासनाला याचे काहीच पडले नसल्याचे दिसून आले. आता शहरातील खड्डे वाढत चालले असून इतरही रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. नव्याने केलेले हे रस्ते असून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कारभाराचा पंचनामा करणारे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.