कोळंबे ग्रामपंचायतीत कृषी दिंडी
कृषिदिन उत्साहात; तीन शेतकऱ्यांना बायोगॅस युनिट
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २ ः जिल्हा परिषद कृषी विभाग, पंचायत समिती व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोळंबे ग्रामपंचायतीत कृषिदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढलेली कृषी दिंडी, शाळा परिसरात वृक्षारोपण आणि शेतकऱ्यांच्या शेतात चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांच्या उपस्थितीत कृषी दिंडीने व वृक्षारोपणाने झाली. या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, कृषी विकास अधिकारी अभिजित गडदे, प्रकल्प संचालक आत्मा विजय बेतीवार, गटविकास अधिकारी चेतन शेळके, जिल्हा कृषी अधिकारी विकास मुळीक, कृषी विद्यावेत्ता डॉ. किरण माळशे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, सरपंच प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. या वेळी पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानावर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.
दापोली कृषी महाविद्यालयातील आरएडब्ल्यूई कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी कोळंबे येथे कृषी माहिती केंद्र स्थापन करून बीजप्रक्रियेवर प्रात्यक्षिक सादर केले, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तंत्रज्ञान अनुभवता आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तीन शेतकऱ्यांना बायोगॅस युनिट, गोठा बांधकाम व फळबाग लागवडीसाठी कार्यारंभ आदेश प्रदान करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.