जाहिरात लेख
74755, 74750
swt27.jpg ते swt210.jpg
रवींद्र चव्हाण
swt211.jpg
74751
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एका कार्यक्रमात.
swt212.jpg
74752
गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत करताना.
swt213.jpg
74753
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत.
swt214.jpg
74754
मालवण येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना.
पुरवणी डोके
मा. रवींद्र चव्हाण अभिनंदन विशेष
कर्तव्यकठोर नेतृत्व
लीड
भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा राजकीयदृष्ट्या लक्षवेधी प्रवास करणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्या निवडीने कोकणातील भाजपला पोलादी ताकद मिळाली आहे. सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले चव्हाण महाराष्ट्र भाजप संघटनेच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या निवडीने जिल्ह्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला आढावा...
- विनोद दळवी
.................
समाजकारण जाहीरपणे रस्त्यावर आणि राजकारण मुत्सद्दीपणे चार भिंतीत केले पाहिजे, असा सर्वसाधारण नियम आहे; पण या नियमाला अपवाद म्हणजे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अर्थात रवीदादा. समाजकारणाची जाहीर वाच्यता करायची नाही. कारण ते दाखविण्यासाठी करण्यापेक्षा कर्तव्य म्हणून करायचं असतं आणि राजकारणात देश व पक्षनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या खांद्यावर उचलायची व ‘न्यूज सायकल’मध्ये न अडकता आपल्यावर सोपविलेली जबाबदारी कर्तव्यकठोरपणे पार पाडायची, हाच रवींद्र चव्हाण यांचा नेहमीचा खाक्या राहिला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष यांच्या विचारधारेचे संस्कार चव्हाण यांच्या मनावर बिंबले आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हा ‘रवी’ नावाचा दादा माणूस उदयाला आला. २००२ मध्ये भाजप युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर राजकारणात सक्रिय झालेल्या चव्हाण यांनी मागे वळून पाहिलेले नाही. २००५ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक म्हणून विजयी होत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिली बाजी मारली. त्यानंतर त्यांचा आलेख नेहमी चढता राहिला. २००७ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पदावर विराजमान झाले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत डोंबिवली विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. या नवनिर्मित मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून त्यांनी दणदणीत विजय मिळविला.
२००९ नंतर २०१४, २०१९ आणि २०२४ असा डोंबिवलीच्या आमदारकीचा विजयी चौकार त्यांनी मारला आहे. यादरम्यान २०१६ मध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली. याच बरोबर त्यांच्याकडे रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली. २०१६ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या ४ खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी तसेच दोन जिल्ह्यांची पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वी सांभाळली.
ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील सर्वाधिक मताधिक्य मिळविणारे आमदार ठरले होते. २०२० मध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर २०२२ ला स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या दोन खात्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून कारभार, तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सहजपणे सांभाळली. अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीत ‘आनंदाचा शिधा’, ‘रेशन आपल्या दारी’ सारखे महत्त्वाचे उपक्रम त्यांनी राबवत यश मिळविले. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहताना रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रात पायाभूत सेवा-सुविधांची क्रांती घडविली. मुंबई-गोवा महामार्गाशी निगडीत केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी, बाधित क्षेत्रातील संबंधित भूधारक, वित्तीय संस्था, कंत्राटदार यांच्याशी समन्वय साधून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या महामार्गाचे सर्वाधिक टप्पे विकसित करण्याचे मोठे कार्य केले. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अखत्यारीतील या महामार्गाचे काम पूर्णत्वास नेण्याकरिता लोकभावनेचा आदर करून जातीने लक्ष घातले.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जवळपास ९२ हजार कोटींची रस्ते आणि पुलांची कामे करण्याची किमया चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून करून दाखविली. या काळात २३ हजार ८८६ कि.मी. लांबीचे रस्ते आणि १ हजार ५४ पूलांचे बांधकाम पूर्ण झाले असून, २९ हजार ४१ कि.मी. लांबीचे रस्ते आणि १ हजार ७९७ पुलांचे बांधकाम प्रगतीपथावर होते. या सोबतच जवळपास ३४ हजार कोटी रक्कमेच्या शासकीय इमारतींचे बांधकाम आणि नूतनीकरण केले. यात प्रामुख्याने न्यायालये, प्रशासकीय कार्यालये, शासकीय विश्रामगृहे आदींचा समावेश आहे.
रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, विमानतळ यांसारख्या २२ पायाभूत सुविधांच्या उभारणी आणि देखभालीसाठी रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) स्थापन करण्यात आले. या सोबतच कोकण रेल्वे मार्गावरील १२ प्रमुख रेल्वे स्थानक परिसरांना आता विमानतळाचा ‘लुक’ मिळाला आहे, ती संकल्पना देखील चव्हाण यांचीच होती.
श्रीराम जन्मभूमी दर्शनासाठी महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी शरयू नदीजवळ अंदाजे ९,५०० चौ. मी. क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या १२ मजली अयोध्या महाराष्ट्र भक्त निवासाचे जमीन अधिग्रहण आणि भूमिपूजन चव्हाण यांच्या नेतृत्वातच झाले. काश्मीर सफरीवर जाणाऱ्या पर्यटकांच्या मोफत निवास सुविधेसाठी काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय चव्हाण यांनी घेतला. त्यांच्या कार्यकाळातच या भवनासाठी जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम येथे जवळपास १०.११७ चौ. मी. जमीन खरेदी केली, तसेच यासाठी ९ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद देखील केली. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थयात्रा असणारी अष्टविनायक यात्रा केवळ एक दिवसात करणे मंत्री चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांनी शक्य झाले आहे. या सोबतच महाबळेश्वर तालुक्यातील श्री उत्तेश्वर मंदिर, कार्ला येथील श्री एकविरा आई मंदिर, खिद्रापूर येथील श्री कोपेश्वर मंदिर अशा अनेक मंदिरांचे जतन, संवर्धन आणि परिसर विकास करण्याचे काम त्यांनी केले आहे.
रवींद्र चव्हाण कट्टर सावरकरभक्त आहेत. मॉरिशस महाराष्ट्र मंडळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा स्थापन करण्यास मोलाचे सहकार्य केले. २०२३ मध्ये या पुतळ्याचे अनावरण मॉरिशसच्या राष्ट्रपतींच्या हस्ते आणि चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. गेली ११ वर्षे डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड ज्योत प्रज्वलित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील नामकरणासाठी २०२१ मध्ये संघर्ष आणि २०२४ मध्ये केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व सुध्दा त्यांनी केले होते. मंत्री म्हणून चव्हाण यांनी असंख्य कामे केली, जी येणाऱ्या काळात पूर्णत्वास गेल्यानंतर महाराष्ट्रवासियांचा प्रवास जलद, सुकर आणि आरामदायी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या दोन्ही विभागांचे डिजिटलायझेशन घडवले, यातून चव्हाण यांची ‘इनोव्हेटिव्ह’ वृत्ती दिसून येते.
प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी संघटन पर्व प्रदेश प्रभारी आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या पदांवर ते कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वात संघटन पर्व अभियानाच्या माध्यमातून जवळपास दीड लाख सक्रिय सदस्य आणि तब्बल दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीच्या ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे. चव्हाण यांचे सर्वसमावेशक आणि सर्वमान्य नेतृत्व लाभल्यामुळे कार्यकर्त्यांना संघटनेचे काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. कामगार वर्गाच्या आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवत, त्यांचा विश्वास चव्हाण यांनी जिंकला आहे. म्हणूनच इंडिगो एअरलाईन्सचे २ हजारांहून अधिक कर्मचारी आणि तब्बल २९ हजारांहून अधिक माथाडी कामगारांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे, शेकापचे माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांसारख्या राज्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या नेतृत्वात भाजपा परिवारात प्रवेश केला आहे.
युवा पिढी, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांशी संवाद साधण्याचे विलक्षण कसब आणि त्यातून कमावलेला दांडगा जनसंपर्क, तसेच देशहित, जनसेवा आणि पक्षनिष्ठा यासाठी अथक मेहनत हीच रवींद्र चव्हाण यांची कार्यशैली आहे.
इंडस्ट्री आणि एज्युकेशन यातील गॅप मिटवण्यासाठी स्थापन केलेल्या डिजिटल अॅकॅडमीच्या माध्यमातून अग्रगण्य कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरीच्या थेट संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ त्यांनी तयार केले आहे. राजकारणात सहसा बघायला न मिळणारा हळवेपणा ही त्यांची खासियत. त्यांच्याकडे आलेला प्रत्येकजण समाधानी वृत्तीनेच परत जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी कुटुंबांचा घराच्या जागेचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित होता. हा प्रश्न सोडवायला काही तांत्रिक अडचणी होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता दरबारात ज्यावेळी ही गोष्ट चव्हाण यांना कळली, तेव्हा त्यांनी पुढचा मागचा विचार न करता स्वतःच्या मालकीची जमीन त्या कातकरी कुटुंबीयांना दान केली.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना विचारधारेशी एकनिष्ठता, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत, उत्तम संवाद कौशल्य आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर गेल्या २५ वर्षांमध्ये चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा प्रवास केला आहे. या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप परिवारातील श्रेष्ठींनी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. संपूर्ण महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, पर्यावरण, वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, संस्कृती अशा अनेक विषयांवर तळमळीने काम करताना त्यांनी आपली ‘मॅन ऑफ मिशन’ ही उपाधी सिद्ध केली आहे. यापुढे देखील ते अशीच उत्तुंग भरारी घेत राहतील, असा विश्वास त्यांच्याबाबत व्यक्त होत आहे. त्यांच्या प्रदेशाध्यक्ष निवडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभागाला भाजपने एक प्रकारे राजकीय ताकद पुरविली आहे. त्यांना नवीन इनिंगसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.