कोकण

साडवलीच्या माळावर दीपकाडीची दुलई

CD

-rat२p६.jpg, rat२p७.jpg-
२५N७४६८७, २५N७४६८८
साडवली येथील माळावर फुललेली दीपकाडी.
(छाया : नेत्रा पालकर आपटे, रत्नागिरी/प्रतीक मोरे, देवरूख)
----
साडवलीच्या माळारानांवर दीपकाडीची दुलई
शुभ्र फुलांची आरास; आषाढवारीचा भास, पर्यटकांचे आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २ ः हिरव्या माळरानांवर फुलणारी विविधरंगी फुले म्हणजे जणू धरणीमातेचे इंद्रधनुष्य असते. देवरूखजवळील साडवली येथे माळरानावर सध्या सर्वत्र दीपकाडीच्या पांढऱ्या फुलांची दुलई पसरल्याचे मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. दीपकाडीचा समावेश संकटग्रस्त प्रजातीमध्ये करण्यात आला आहे. दीपकाडीला गुलछडी असेही म्हटले जाते. यावर्षी पावसाला मे महिन्यातच दमदार सुरुवात झाल्याने दीपकाडीची मनमोहक फुलं आषाढाचे स्वागत करत आहेत. परिणामी, हिरव्यागार निसर्गात शुभ्र फुलांची जणू आषाढवारीच सुरू असल्याचा भास होत आहे.
साडवलीच्या माळरानावरील हा अनोखा नजारा पाहण्यासाठी केवळ स्थानिक ग्रामस्थच येतात असे नव्हे तर संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची पावलंदेखील हा सुंदर नजारा पाहून जागीच थबकतात. दीपकाडी ही वनस्पती अत्यंत नाजूक असल्याने पर्यटकांनी ती पायदळी तुडवू नये तसेच छायाचित्रे घेताना देखील या वनस्पतीचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन सृष्टीज्ञान संस्थेने केले आहे.
दीपकाडी म्हणजेच गुलछडीची कथा उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी सुरू होते. कातळाच्या गर्भातून प्रकटलेल्या हिरव्यागार पाती वाढत जाऊन एका दांडीच्या रूपात मोठ्या होतात. आषाढाच्या दिवसभर पडणाऱ्या पावसात त्यांना अलगद कळ्या येतात. दांडीच्या टोकाला पांढरेशुभ्र गायमुखी फुलं आले की, नंतरच या वनस्पतीचे महत्त्व अधोरेखित होते. हिरवागार शालू नेसलेला काळा कातळसडा वर्षभर दुर्लक्षित असला तरी या पांढऱ्या फुलांनी तो अचानक नजरेत भरू लागतो. चरणारी गुरं, फुलांवर लपून बसलेले कोळी आणि इतर कीटक, अलगद फिरणारे पिपिट आणि चंडोल, पाय पडला की, अचानक उड्या मारणारे बेडूक असे सर्वच जीव या फुलोऱ्याच्या आश्रयाला येतात, अशी माहिती प्रतीक मोरे यांनी दिली.

१६ एकरवर शुभ्र सडा
यावर्षी मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्यामुळे दीपकाडीची सर्व फुलं लवकर बहरून श्रावणाआधी आषाढ महिन्याचे स्वागत करत आहेत. साडवली येथील १६ एकर परिसरात सध्या दीपकाडीची फुलं दाटीवाटीने फुलायला सुरुवात झाली असून, ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT