
लोकल ट्रेनमध्ये तरुणाने तरुणीशेजारी बसून अश्लील कृत्य केल्याने प्रवाशांमध्ये संताप पसरला आहे.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इतर प्रवाशांनी त्या तरुणाला चोप दिला.
महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी होत असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Trending Video : सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठाणे-वाशी हार्बर लाइनच्या लोकल ट्रेनमध्ये मंगळवारी (२६ ऑगस्ट) दुपारी १:३० वाजता घडलेल्या विनयभंगाच्या धक्कादायक घटनेने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. एका तरुणाने प्रवासादरम्यान तरुणीच्या बाजूच्या सीटवर बसून हस्तमैथुनासारखे अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे समाजातील विकृत मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.