swt217.jpg
74791
पाडलोसः जिल्हास्तरीय भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेले लक्ष्मण परब यांचा सन्मान करताना अधिकारी.
फळबागांसाठी ‘सीआरए’ तंत्रज्ञान फायद्याचे
मंगेश जाधव : पाडलोसमध्ये शेतकरी मेळावा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ः शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करताना सीआरए तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. यासाठी दाखविण्यात आलेल्या सीआरए तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाप्रमाणे लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पाडलोस येथील कृषी तंत्र विद्यालय येथे जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच ग्रामपंचायत पाडलोस यांच्यावतीने कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी श्री. जाधव बोलत होते. व्यासपीठावर पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र पाटील, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य शैलेश परब, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. यशवंत गोवेकर, मृदा शास्त्रज्ञ डॉ. मोरे, कृषी तंत्र विद्यालयाच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास गवस, सावंतवाडी पंचायत समिती कृषी अधिकारी शुभदा कविटकर, पाडलोस ग्रामसेवक प्रतिभा आळवे, उपसरपंच राजू शेटकर आदी उपस्थित होते.
यावेळी गावातील तिन्ही प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी कृषी दिंडी काढली. उपस्थित शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे सीआरए तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासह बांदा मंडळ कृषी अधिकारी युवराज भुईंबर व त्यांचे सहकारी यांनी करून दाखविले. तालुका कृषी अधिकारी गोरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविले. वेंगुर्ले येथील शास्त्रज्ञ डॉ. मोरे यांनी भात पीक एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. गोवेकर यांनी भात पीक कीड व रोगांबाबत मार्गदर्शन केले. उपकृषी अधिकारी श्री. सरगुरू, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी मार्गदर्शन केले.
शुभदा कविटकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पाडलोस कृषी तंत्र विद्यालय यांच्यामार्फत उपस्थित शेतकऱ्यांना सुपारी रोपांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाडलोस सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, ग्रामपंचायत कर्मचारी, सहाय्यक कृषी अधिकारी ननवरे व पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी एकनाथ सावंत, श्री. शेळके आदींनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट
जिल्हा भात पीक स्पर्धेत परब प्रथम
जिल्हास्तरीय भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या नेमळे येथील शेतकरी लक्ष्मण परब, तालुकास्तरावर भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारे मळेवाड येथील शेतकरी नारायण मधुसूदन मुळीक, द्वितीय क्रमांक निरवडे येथील भरत नारायण माणगावकर, तृतीय क्रमांक पटकावणारे धाकोरे येथील बाळकृष्ण लक्ष्मण हळदणकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
चौकट
नाईक, परब यांचा सत्कार
शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना आदर्श पत्रकार पुरस्कार मिळवणारे पाडलोस विकास सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष विश्वनाथ नाईक तसेच प्रवीण परब यांचा सत्कार करण्यात आला. सहाय्यक कृषी अधिकारी ननवरे, बायोगॅस व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक यांचाही सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.