कोकण

मुळदेत वृक्ष संवर्धनाबाबत जागृती

CD

swt219.jpg
74806
मुळदे ः वसंतराव नाईक जयंती आणि कृषी दिनानिमित्त वृक्षारोपणाने मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयात साजरा करण्यात आला.

मुळदेत वृक्ष संवर्धनाबाबत जागृती
कृषी दिन उत्साहातः उद्यान विद्या महाविद्यालयाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कृषी क्षेत्रातील आधारस्तंभ वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १) उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये अभिवादन व भाषणे तसेच वृक्षारोपण उपक्रम यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. दळवी यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
या उपक्रमात सुमारे १००० झाडांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये बांबू (माणगा व माणवेल), केळी, केशर आंबा, काळी मिरी, नारळ, सुपारी अशा प्रजातींचा समावेश होता. या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. दळवी यांनी केले. डॉ. एम. एस. शेडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. प्रा. हर्षवर्धन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व एनसीसी कॅडेट्स तसेच एनसीसी कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. आर. उईके यांच्या नेतृत्वाखाली एनएसएस स्वयंसेवकांनी विशेष सहभाग नोंदवला. त्यांनी वृक्षलागवडीसाठी गट तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने झाडे लावण्यात पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT