कोकण

सिंधुदुर्गात हॉटेलना मिळणार रेटिंग

CD

सिंधुदुर्गात हॉटेल्सना मिळणार रेटिंग
स्वच्छता गुणांकन : लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी, निवास यांचाही समावेश
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ ः जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास यांचे ''स्वच्छता ग्रीन लिफ रेटिंग'' अंतर्गत गुणांकन होऊन १, ३ व ५ लिफ नामांकन देण्यात येणार आहे. या रेटिंगच्या माध्यमातून देशी-विदेशी पर्यटक येथिल हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास आस्थापनांना भेट देतील. त्याचा फायदा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढण्याकरिता होऊ शकतो. ग्रीन लिफ रेंटिंगकरिता लागणारा स्वयंमूल्यांकन फॉर्म जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास व्यावसायिकांनी या कार्यक्रमांत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
स्वच्छता ग्रीन लिफ रेटिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता सोमवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी पाटील यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन केले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पाणी व स्वच्छ्ता उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे उपस्थित होते.
पाणीपुरवठा स्वच्छता मंत्रालय व पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास यांचे घनकचरा व्यवस्थापन, मैलागाळ व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन या तीन निकषांवर गुणांकन होणार आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ८० गुण, मैला गाळ व्यवस्थापनाकरिता ८० गुण तर सांडपाणी व्यवस्थाप अंतर्गत ४० गुण असे २०० गुण निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये १०० ते १३० गुण ज्या आस्थापनेस मिळणार आहेत त्यांना १ लिफ, १३० ते १८० गुण मिळविणाऱ्या आस्थापनेस ३ लिफ तर १८० ते २०० गुण प्राप्त करणाऱ्या आस्थापनेस ५ लिफ गुणांकन प्राप्त होणार आहे; मात्र १ लिफ गुणांकन प्राप्त करण्याकरिता मैलागाळ व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत किमान ४० गुण तर सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत किमान २० गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. ३ लिफ गुणांकन प्राप्त करण्याकरिता मैलागाळ व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत किमान ५० गुण तर सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत किमान २० गुण प्राप्त करणे आवश्यक आहे, तर ५ लिफ गुणांकन प्राप्त करण्याकरिता मैलागाळ व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत किमान ६० गुण तर सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत किमान ३० गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
हॉटेल आस्थापना यांनी स्वयंमूल्यांकन करून अर्ज पंचायत समिती येथे ३० जुलैपर्यंत सादर करावयाचा आहे. स्वच्छता ग्रीन लिफ रेटिंग अतर्गत तालुकास्तरावर पडताळणी समितीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी याच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पर्यटन किंवा उद्योग क्षेत्रातील, पाणीपुरवठा विभाग (तांत्रिक बाबी पाहणारे) अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन तथा जिल्हा समन्वयक (स्वच्छ भारत मिशन) सदस्य सचिव, पर्यटन विभाग, एमटीडीसी जिल्हा प्रतिनिधी सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सद्स्य, जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने पर्यटन, हॉटेल उद्योगातील प्रतिनिधी सदस्य यांची समिती स्थापन करून जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास यांची तपासणी करण्यात येणार आहे.

swt२१६.jpg
अनिल पाटील

कोट
हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास या आस्थापनांना ग्रीन लिफ रेटिंग अंतर्गत १ ते ५ असे मिळणारे लिफ रेटिंग जिल्ह्यातील पर्यटनाकरिता पूरक ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास आस्थापना यांनी ग्रीन लिफ रेंटिंगकरिता लागणारा स्वयंमूल्यांकन फॉर्म जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संकेतस्थळावरून घेऊन पंचायत समिती येथे सादर करावा.
- अनिल पाटील, जिल्हाधिकारी पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT