‘घरडा’मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा
लोटेतील १४ उद्योगांचा पुढाकार; रासायनिक नमुन्यांची चाचणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात रसायन अभियांत्रिकी विभागात स्थापन केलेली अॅडव्हान्स रिअॅक्टिव्ह सिस्टिम स्क्रिनिंग टूल (एआरएसएसटी) ही अत्याधुनिक प्रयोगशाळा लोटे एमआयडीसीमधील १४ नामांकित उद्योगांनी उभारली आहे. उद्योगातील रासायनिक नमुन्यांची चाचणी नियमितपणे या प्रयोगशाळेत केली जात आहे.
एआरएसएसटी हे उपकरण रासायनिक प्रतिक्रियांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आहे. त्यात दाबवाढ, उष्मानिर्मिती, प्रक्रिया दर या बाबींचे परीक्षण होते. या चाचण्यांमधून उद्योगांना त्यांच्या प्रक्रियांतील संभाव्य धोके ओळखण्यास आणि योग्य ती सुरक्षा उपाययोजना आखण्यास मदत होते. ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची ठरत आहे. त्यांना लोटे एमआयडीसीतील उद्योगांशी थेट संपर्क साधता येतो तसेच प्रत्यक्ष औद्योगिक नमुन्यांवर काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे विभागाचा शैक्षणिक दर्जा व औद्योगिक संबंध अधिक बळकट झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.