कोकण

डी. जी. बांदेकर ट्रस्टतर्फे सावंतवाडीत वृक्षारोपण

CD

फोटो नाही

टीपः swt226.jpg मध्ये फोटो आहे.
सावंतवाडी ः बांदेकर फाईन आर्ट कॉलेजच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.


डी. जी. बांदेकर ट्रस्टतर्फे
सावंतवाडीत वृक्षारोपण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी संस्थेतर्फे मंगळवारी (ता. १) कृषी दिनानिमित्त बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट (अप्लाइड आर्ट) च्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम फाउंडेशन आर्टच्या विद्यार्थ्यांनी आणि अप्लाइड आर्ट विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे उत्साहात साजरा केला. बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. महाविद्यालयाच्या हरित परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला. या कार्यक्रमाला डी. जी. बांदेकर ट्रस्टचे चेअरमन केदार ऊर्फ गोविंद बांदेकर, खजिनदार गीता बांदेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य उदय वेले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रा. सिद्धेश नेरुरकर, तुकाराम मोरजकर, प्राजक्ता वेंगुर्लेकर, तुळशीदास नाईक, धनंजय परब, राधा गावडे, चेतन जगताप, आत्माराम शिरोडकर, सुभाष राव, अनिल बांदेकर, पल्लवी गावडे, हनुमंत केरकर, चारुदत्त शंकरदास यांच्यासह महाविद्यालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंतिम वर्षाच्या समृद्धी पोटफोडे या विद्यार्थिनीने या दिनाबद्दल माहिती दिली. विष्णुप्रसाद सावंत याने उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT