कोकण

-पालूतील घरावर विजेचा खांब कोसळला

CD

- rat२p४८.jpg-
२५N७४८३४
लांजा ः पालू येथील मनोहर नामे यांच्या घरावर पडलेला महावितरणचा विद्युतखांब.
------
पालूत घरावर विद्युत खांब कोसळला
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २ ः दोन दिवस जोरदार पाऊस असून बुधवारी सकाळी पडलेल्या वादळी पावसाने पालू गावातील एका घरावर महावितरणचा विद्युत खांब कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. घरातील माणसे शेतात गेल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला; मात्र महावितरणचा विद्युतपुरवठा दिवसभर खंडित झाला होता.
पालू गावातील मनोहर आत्माराम नामे यांच्या घरावर महावितरणचा विद्युतखांब पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. काही दिवस ऊन-पावसाचा लपंडाव सुरू असतानाच सोमवारपासून पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. सकाळी ९.३० वाजता पडलेल्या पावसाने पालू परिसराला झोडपले. यामध्ये महावितरणचा विद्युतखांब येथील मनोहर नामे यांच्या घरावर कोसळला. त्यामुळे घराचे पत्रे फुटले असून भिंतीला भेगा गेल्या आहेत. घरातील काही माणसे शेतामध्ये गेल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला तर गावातील काही ठिकाणी विद्युतखांब जमिनीकडे झुकल्याने पावसाळ्यात कोसळण्याची दाट शक्यता येथील नागरिकांनी वर्तवली आहे. पालूतील अनेक ठिकाणी महावितरणचे विद्युतखांब गंजलेल्या, सडलेल्या अवस्थेत असून, ग्रामस्थांनी अनेकवेळा महावितरणकडे दुरवस्थेतील खांब काढून त्या ठिकाणी नव्याने उभे करावेत, अशी मागणी केली होती; मात्र ग्रामस्थांच्या या मागणीकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने पालू गावातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी पडलेल्या पावसामुळे जीर्ण झालेला विद्युतखांब पडून येथील शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT