कोकण

पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजना

CD

‘पीएम सूर्यघर मुक्त बिजली’ योजना
डॉ. सोपान शिंदे ः गृहनिर्माण संस्थांनी लाभ घ्यावा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड तालुक्यांची निवड करण्यात आलेली आहे. या तालुक्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी साहाय्यक निबंधक कार्यालय आणि महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत देशात १ कोटी घरांना सौरऊर्जा सबसिडीद्वारे पुरवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी देशातील १०० शहरांची निवड केली आहे. ''हर घर सूर्यघर'' हा विषय यापुढे असणार आहे. शंभर शहरामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तीन तालुक्यांमधील ज्या गृहनिर्माण सहकारी संस्थांकडे छतावरील सौरऊर्जा साठी जागा उपलब्ध आहे अशा गृहनिर्माण सहकारी संस्थांची प्राधान्याने निवड करावयाची आहे. गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी साहाय्यक निबंधक तसेच महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT