कोकण

आरटीईअंतर्गत जिल्ह्यात ५३६ जागांवर प्रवेश

CD

(शाळा फोटो वापरवणे)
‘आरटीई’अंतर्गत ५४६ जागांवर प्रवेश
१५६ जागा रिक्त ; खोट्या कागदपत्रांचा वापर नाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) समाजीतील आर्थिक दुर्बल घटक तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शिक्षणसंस्थेत २५ टक्के रिक्त जागा ठेवून प्रवेश देण्यात येतो. या अंतर्गत जिल्ह्यात ५४६ जागांवर प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. पसंतीची शाळा नसणे किंवा कागदपत्रांची अपूर्णता ही प्रामुख्याने प्रवेश न घेण्यामागील कारणे आहेत; परंतु खोटी कागदपत्रे जोडून प्रवेश घेण्याचा प्रकार जिल्ह्यात घडलेला नाही.
प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे यासाठी बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणहक्क कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार आर्थिक दुर्लब तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील पालक आपल्या पाल्यांचा शाळा प्रवेश घेत असतात. आरटीईअंतर्गत ९१ शाळांमध्ये ७८२ जागांसाठी प्रवेशअर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी जिल्ह्यातील ९०७ पालकांनी अर्ज केले होते. लॉटरी पद्धतीने यामधून ७०२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रत्यक्ष ५४६ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे; मात्र काही अर्जात त्रुटी असल्याने रद्द झाले आहेत. प्रवेश मिळवण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतला जात नसल्याने शिक्षण विभागाने सांगितले. आरटीई प्रवेशासाठी केलेल्या ९०७ पालकांच्या अर्जापैकी ७०२ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील १५६ जागा प्रवेशाअभावी अजूनही रिक्त राहिल्या आहेत. पसंतीची शाळा नसल्याने पालक याकडे पाठ फिरवतात तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची वेळेवर पूर्तता न झाल्यास प्रवेशापासून वंचित राहात आहेत, असे दिसत आहे.
---
कोट
आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये २५ टक्के रिक्त जागेवर प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येते. निवड होऊनही काही जागा रिक्त आहेत. त्यासाठी कारणेही वेगळी आहेत; मात्र प्रवेशासाठी खोटी कागदपत्रे सादर करण्याचा प्रकार होत नाही.
- बी. एस. कासार, शिक्षणाधिकारी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT