-rat२p४५.jpg-
२५N७४८१६
रत्नागिरी ः शहरातील साळवीस्टॉप-नाचणे रोड येथे रात्री हिंडणारी जनावरे.
-----
मोकाट जनावरे पकडण्याचा दिखावा
रस्त्यावर ठिय्या ; वाहनचालकांना सावधानतेचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः शहरातील साळवीस्टॉप-नाचणे, आयटीआय रस्त्यावर रात्रीच्यावेळी मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता आहे. मोकाट जनावरे पकडण्यासाठी पालिकेची एक दिवसाची मोहीम होती की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शहरातील साळवीस्टॉप, नाचणे, काजरघाटी रोड, जे. के. फाईल्स, आरोग्य मंदिर, नाचणे रोड तसेच रत्नागिरी बाजारपेठ व गाडीतळ, परटवणे या ठिकाणी अद्यापही मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. अलीकडे काही दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतली असल्याने पडणाऱ्या कडक उन्हात मोकाट जनावरे रस्त्यावर खाण्यासाठी येत असतात. त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे; मात्र साळवीस्टॉप परिसरात मंगळवारी (ता. १) रात्री आठ-साडेआठच्या सुमारास मोकाट जनावरांची शाळाच भरल्याचे दिसून आले.
पालिकेने शहरात मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती. २७ जूनला दिवसभरात ४२ जनावरे पकडली; मात्र त्यानंतर पुन्हा ही मोहीम थंडावली आहे. त्यामुळे ही मोहीम केवळ एक दिवसाचीच होती की काय, अशी चर्चा सुरू आहे. साळवीस्टॉप व आरोग्य मंदिर, नाचणे रस्त्यावर पुन्हा मोकाट जनावरे दिसू लागली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.