कोकण

नियोजनबद्ध व्यावसायिक शेती करा

CD

नियोजनबद्ध व्यावसायिक शेती करा
सूर्यकांत पाटीलः करूळ येथे कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळावा
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २ः शेतीतून कुटुंबाच्या गरजा भागल्याच पाहिजेत; परंतु शेती उत्पादनातून आर्थिक उत्पन्न देखील मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा नियोजनबध्द वापर व्यावसायिक शेती किफायतशीर ठरेल, असे मत तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी येथे व्यक्त केले.
पंचायत समिती वैभववाडी व महाराष्ट्र शासन कृषी विभाग वैभववाडी ग्रामपंचायत करूळ यांच्यावतीने कृषी दिनानिमित्त करूळ येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, उपविभागीय अधिकारी उमाकांत पाटील, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, जिल्हा बॅंक माजी संचालक दिगंबर पाटील, सरपंच नरेंद्र कोलते, प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रसाद देवधर, प्रा. विवेक कदम, उपसरपंच सचिन कोलते, बाळा सुतार, प्रगतशील शेतकरी मंगेश कदम, महेश संसारे, विलास देसाई, उदय कदम, सुरेश सुतार, मंडल कृषी अधिकारी मंदावाड आदी उपस्थित होते.
श्री. पाटील यांनी, वैभववाडीत शेतीला मोठी संधी आहे. या भागात लहान मोठे जलसिंचन प्रकल्प आकाराला येत आहेत. त्यामुळे हा भाग भविष्यात समृध्द झालेला दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला. भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांनी, सामाजिक व्यवस्थेने राजकीय व्यवस्थेला कधीतरी सांगायला हवे, त्यांनी नेमके काय करायला हवे. शेतकरी हा उत्पादक आहे. शेतकरी जगला तर तुम्ही जगाल. त्यामुळे त्याचा भाव करू नका. बाजारात काय विकले जात आहे, काय शाश्वत आहे, ते पिकविण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच आपण पुढे जाणार आहोत. आपल्याला स्वतःच्या मालाची किंमत ठरवता आली पाहिजे. आपल्या गरजा भागतील इतके तरी आपण पिकवतो का? माझ्या घरच्या गरजा काय आहेत? हे ओळखून ते पिकविण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण पिकवलेले उत्पादन विकण्याची आपल्याला लाज वाटता कामा नये, असे सांगितले.
यावेळी पुरस्कार प्राप्त शेतकरी मंगेश कदम, भात पीक स्पर्धेतील विजेते ॲड. अजितसिंह काळे, सुनील पवार, नवलू झोरे या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT