कोकण

१४७ हरकतींवर शुक्रवारपासून सुनावणी

CD

हरकतींवर उद्यापासून सुनावणी
जीवन देसाई ः वाटद एमआयडीसीसाठी भूसंपादन प्रक्रिया
रत्नागिरी, ता. २ : रिलायन्सच्या बंदुका बनवणाऱ्‍या कंपनीसाठी एमआयडीसी जागा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी तालुक्यातील वाटद पंचक्रोशीतील जागेचे भूसंपादन प्रक्रिया झाली आहे. याबाबत १४७ हरकती आल्या असून, त्यावर शुक्रवारपासून (ता. ४) सुनावणी प्रक्रिया येथील उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्या कार्यालयात होणार आहे. यामध्ये वैयक्तिक आणि सामुदायिक अर्जांचा समावेश आहे.
या दोन प्रकल्पांमुळे जवळपास ३० हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. रत्नागिरी आणि उंडी-रिळ परिसरात सेमीकंडक्टरचा प्रकल्प तर वाटद पंचक्रोशीत बंदुका बनवणारा रिलायन्सचा प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी वाटद, कोळीसरे, मिरवणे, कळझोंडी, गडनरळ परिसरातील जागेचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी जागेची निश्चितीही झाली आहे. जागेचे अधिग्रहण केले जाणार असून, महसूल विभागाने या संदर्भात आता सुनावणी कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामस्थांच्या शंका व समस्या जाणून घेणार आहेत. यासाठी शुक्रवारी (ता. ४) पासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. कोळीसरे येथून १७ वैयक्तिक अर्जदार असून, त्यात २० खातेदार आहेत. त्यांची सुनावणी सकाळी ११ वाजता तर मिरवणे येथील १० अर्जदारांची सुनावणी दुपारी १ वाजता होणार आहे. जिजाऊ संघटनेतर्फेही अर्ज करण्यात आले होते. यातील कोळीसरेतील १०२ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्‍या असून, त्यावर ४ वाजता सुनावणी होणार आहे.
कळझोंडी येथील ४ ग्रामस्थांनी वैयक्तिक अर्ज केले असून, त्यांची सुनावणी सोमवारी ७ जुलैला सकाळी ११ वा. होणार आहे. जिजाऊ संघटनेच्या अर्जावर दुपारी ४ वाजता सुनावणी होणार आहे. यावर १६५ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्‍या आहेत. वाटद गावची सुनावणी ८ जुलैला असून, १०३ ग्रामस्थांनी वैयक्तिक अर्ज केले असून, त्यात १७६ खातेदार आहेत. त्यांची सुनावणी सकाळी ११ वाजता होणार आहे. वाटदसंदर्भात जिजाऊ संघटनेने केलेल्या अर्जावर बुधवारी ९ जुलैला सुनावणी होणार आहे. या अर्जावर २८१ ग्रामस्थांच्या अर्जावर स्वाक्षऱ्या आहेत. गडनरळ येथील १२ अर्जावर गुरुवार १० जुलैला ११ वाजता सुनावणी होणार असून, यात ६० खातेदार आहेत तर जिजाऊ संघटनेने केलेल्या अर्जावर ४ वाजता सुनावणी होणार आहे. यावर ७३ ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्‍या केल्या आहेत. या सर्व अर्जदारांच्या अर्जावर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ३२ (३) अन्वये सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT