कोकण

वारगाव येथून ३ हजाराचा गांजा जप्त

CD

वारगाव येथून ३ हजाराचा गांजा जप्त
कणकवली, ता.२ ः तालुक्‍यातील वारगाव रोडयेवाडी येथील प्रवीण उर्फ बबन आत्‍माराम गुरव (वय ५५ ) याच्या घरातून ३ हजार २० रुपयांचा गांजा स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने जप्त केला. ही कारवाई काल (ता.१) रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली. गुरव यांच्या घरातील फोटोमागे गांजाची पुडी लपवून ठेवली होती अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून देण्यात आली.
मुंबई गोवा महामार्गावरील वारगाव रोडये वाडी येथील प्रवीण गुरव गांजा विक्री करतो अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती. त्‍यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, पोलीस सदानंद राणे, स्वाती सावंत. विल्सन डिसोजा, डॉमनिक डिसोजा, किरण देसाई, बस्त्याव डिसोजा, जॅक्‍सन घोन्सालविस आदींनी काल (ता.१) रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या घरी छापा टाकला. यावेळी घरातील फोटोमागे एक काळ्या रंगाची पिशवी आढळून आली. त्‍यामध्ये ११२ ग्रॅम वजनाचा आणि सुमारे ३ हजार २०० रूपयांचा गांजा आढळून आला. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT