swt315.jpg
N75015
लोरे क्र. २ ः कृषिदूतांच्या वतीने कृषी साजरा करण्यात आला.
लोरे येथे कृषी तंत्रज्ञानाचे धडे
तळेरे : (कै.) राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषीच्या अंतिम वर्षाच्या कृषिदूतांनी ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमअंतर्गत लोरे क्र. २ येथे कृषी दिन आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त वृक्षदिंडी, वृक्षरोपण व कृषिदुतांमार्फत नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती यासारखे उपक्रम राबविण्यात आले. उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांच्यासोबत वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रा. एन. पी. डावरे व शिक्षकांचे सहकार्य लाभले. कृषिदूत महेश वगरे, सुजित हाक्के, शंभुराजे पाटील, प्रतीक नलवडे, दिग्विजय झांबरे, जयवंत बोकारे, सत्यजित आवळेकर, अविष्कार पाटील, शुभम कुंभार, प्रथम वेरूळकर या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज संते, कार्यक्रमाचे समन्वयक साईराम चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
.................
swt317.jpg
75016
सावंतवाडी ः आनंद शिशुवाटिकेत वारकरी दिंड़ी काढण्यात आली.
आनंद शिशुवाटिकेत बाल वारकरी दिंडी
सावंतवाडीः आषाढी वारीचे औचित्य साधून कळसुलकर शाळेच्या आनंद शिशुवाटिकेने आपल्या सर्व विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी आज आयोजित केली. ही छोट्या वारकऱ्यांची दिंडी येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात पोहोचली. डोक्यावर तुळशी आणि हाती भगव्या पताका, टाळ घेऊन हे छोटे वारकरी विठ्ठलभक्तीत तल्लीन झाले. विद्यार्थी वर्गांसमवेत शिशुवाटिकेच्या शिक्षिका आणि कर्मचारी वर्ग सुद्धा तल्लीन होऊन अभंग गायन करताना दिसला. आनंद शिशुवाटिकेच्या या उपक्रमाचे श्री विठ्ठल मंदिर सावंतवाडीच्या वतीने कौतुक करण्यात आले.
..................
गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये
सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत तालुका आणि जिल्हा गुणवत्ता यादीत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अव्वल गुण प्राप्त केले. जिल्हा गुणवत्ता यादीत सहावीचा विद्यार्थी सर्वेश गावडे तसेच तालुका गुणवत्ता यादीत अर्णव माने (सहावी), विराज गवस (सहावी), गौरांग पेडणेकर (सातवी), तेजस आर्दळकर (सातवी), चैतन्य पवार (सातवी) या विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान प्राप्त केले. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थी पूर्वतयारीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, ऑलिम्पियाड परीक्षा देतात. गुणवंत विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जॉय डांटस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्रा. नितीन गावडे, सर्व संचालक आणि पालकांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.