कोकण

गिरणी कामगारांचा बुधवारी ''लाँग मार्च''

CD

swt323.jpg
75027
सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसांच्या बैठकीत अध्यक्ष शाम कुंभार, लॉरेन्स डिसोझा, रामचंद्र कोठावळे, सुभाष परब, विश्वनाथ कुबल, रेखा लोंढे आदी.

गिरणी कामगारांचा बुधवारी ‘लाँग मार्च’
शाम कुंभार ः घरांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या घरांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता मुंबई येथे राणीबाग ते विधानभवन असा भव्य लाँग मार्च काढण्यात येणार आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगार आणि त्यांचे वारस मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष शाम कुंभार यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाची बैठक कुंभार यांच्या उपस्थितीत आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट कार्यालयात झाली. या लाँग मार्चमध्ये कामगार आणि वारसांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले. या बैठकीला लॉरेन्स डिसोझा, रामचंद्र कोठावळे, सुभाष परब, विश्वनाथ कुबल, अभिमन्यू लोंढे, अशोक दळवी, रेखा लोंढे उपस्थित होते.
श्री. कुंभार व श्री. डिसोझा यांनी सांगितले की, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत १४ कामगार संघटना घरांच्या प्रश्नावर एकत्रित आल्या आहेत. अनेक मागण्यांमध्ये शेलू आणि वांगणी येथील घरांना विरोध करत मुंबईमध्येच घरे मिळावीत, अशी या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. गिरणी कामगार, त्यांचे वारस आणि नातेवाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून एकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे मान्यवर पदाधिकारीदेखील या लाँग मार्चला उपस्थित राहणार असल्याने, घरांच्या प्रश्नावर सरकारला घेरल्यास न्याय मिळू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. म्हाडाकडे लॉटरीत फॉर्म भरूनही लॉटरी जाहीर न झाल्याने सरकारला जागे करुया, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी श्रीधर नाईक, प्रकाश मांजरेकर, नीलेश महाजन, अमित गोडकर, शिवराम राऊळ, प्रसाद गावडे, राजेश देसाई, प्रकाश गवस, परशुराम महाडेश्वर, अजय नाईक, राजाराम खानोलकर, प्रसाद धुरी, सुरेश बिर्जे, मदन नारोजी, बाळकृष्ण नाईक, रवींद्र पेडणेकर, अनंत राऊत, दशरथ नाईक, तुळशीदास एकावडे, मोहन सावंत, तुषार सावंत, राजन नाईक, अमित नाईक, प्रज्योत सावंत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT