
Ganesh Visarjan
ESakal
मुंबई : मुंबईसह राज्यभरात गणरायाचे विसर्जन मोठ्या थाटामाटात होत आहे. बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी अनेक ठिकाणी भाविकांची मांदियाळी जमली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि पालिका प्रशासन सज्ज झाली असून कडक बंदोबस्त लावला आहे. मुंबईतील लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा (गणेशगल्ली) अशा अनेक मूर्तींची विसर्जन मुरवणुकीला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. मात्र अशातच मुंबईतील एका प्रसिद्ध गणेश मंडळाने गणरायाचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे.