कोकण

एकादशी सोहळ्याचे दोडामार्गात आयोजन

CD

एकादशी सोहळ्याचे
दोडामार्गात आयोजन
दोडामार्ग : येथील श्री पांडुरंग मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. ५) रात्री ८ वाजता हरिपाठाने कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. दत्ताराम चारी यांच्या बालभजन मंडळाचे भजन होईल. रविवारी (ता. ६) पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ११ वाजता शारदा आरोंदेकर यांचे कीर्तन, सायंकाळी ४ वाजता वारकरी कीर्तन, ७ वाजता हरिपाठ व विश्वास मेस्त्री यांची अभंगवाणी, मंगळवारी (ता. ७) पहाटे ५ वाजता काकड आरती, दुपारी ११ वाजता दिंडी व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
...................
नडगीवे शाळेत
शिक्षण परिषद
कासार्डे : जिल्हा परिषद शाळा, नडगीवे क्र. १ येथे एक महत्त्वपूर्ण शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेने केवळ शिक्षकांना एकत्र आणले नाही, तर नवीन शैक्षणिक धोरणाच्या आव्हानांना आणि संधींना सामोरे जाण्यासाठी त्यांना वैचारिक खाद्य आणि नवी दिशा दिली. कणकवलीचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांच्या प्रमुख उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने या परिषदेला एक नवी उंची प्राप्त झाली. या ज्ञानयज्ञात विविध विषयांवर सखोल मंथन झाले. बालवाटिकेपासून ते नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक पैलूवर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला. या परिषदेमुळे उपस्थित शिक्षकांना केवळ माहिती मिळाली नाही, तर वर्गात नवनवीन प्रयोग करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याला योग्य आकार देण्यासाठी एक नवा आत्मविश्वास मिळाला.
..................
कट्टा येथे रविवारी
साहित्य संमेलन
मालवण : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ आयोजित जिल्हास्तरीय मराठी कवी साहित्य संमेलन (वर्ष पहिले) रविवारी (ता. ६) दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ओम साई गणेश मंगल कार्यालय, कट्टा येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन ज्येष्ठ साहित्यिक, कवी तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई सदस्य विठ्ठल कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिका, कवयित्री संध्या तांबे असून, प्रमुख अतिथी म्हणून लेखक, कवी, रंगकर्मी, रंगभूमी सेन्सॉर बोर्ड सदस्य विजय चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

SCROLL FOR NEXT