कोकण

नव्या पिढीने शेतीकडे वळावे

CD

swt334.jpg
75086
मठ ः येथे वन विभाग आणि फुले शाहू आंबेडकर विचारमंच तर्फे कृषीदीन साजरा करण्यात आला.

नव्या पिढीने शेतीकडे वळावे
जयप्रकाश चमणकरः खानोलकर हायस्कूलमध्ये कृषी दिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ ः कृषीमध्ये विविध प्रयोग करून इथल्या प्रयोगशिल शेतकऱ्यांनी आर्थिक सुबत्तेचे स्वप्न पाहिले आहे. ते पूर्णत्वास नेण्यासाठी नव्या पिढीने शेतीकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन प्रगतशील आंबा बागायतदार तथा फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी मठ येथे केले.
वनीकरण विभाग आणि फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांच्यावतीने मठ येथील रा. धो. खानोलकर हायस्कूलमध्ये कृषी दिन साजरा केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुनील भिसे, प्रा. वसंत नंदगिरीकर, मठ येथील आंबा बागायतदार विलास ठाकुर, प्रताप नर्सरीचे मालक शिवराम आरोलकर, फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे सचिव महेंद्र मातोंडकर, सामाजिक वनीकरण विभारच्या वनपाल दिप्ती मोर्ये, वनरक्षक प्रमोद चव्हाण व ऋतुजा कदम, मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव, अध्यापिका स्वप्नाली कांबळी, अतुल वाढोकर अनिकेत कांबळे आणि शालेय मुख्यमंत्री प्रज्वल धुरी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले.
कृषी दिनाचे महत्त्व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कार्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्र याबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शिवराम आरोलकर, विलास ठाकुर, प्रा. वसंत नंदगिरीकर, प्रा. डॉ. सुनील भिसे, महेंद्र मातोंडकर, वनपाल दिप्ती मोर्ये यांनी यावेळी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन मठ हायस्कूलचे अध्यापक गणुराज देसाई यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी मानले. मुख्य कार्यक्रमानंतर मठ हायस्कूलच्या आवारात वनविभाग आणि फुले शाहू आंबेडकर विचारमंचतर्फे विविध फळझाडांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT