-rat४p२७.jpg-
२५N७५२६४
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाकडे जाणारा खडतर मार्ग.
------------
‘गोगटे’ बाहेरील रस्त्याची दुर्दशा
अभाविप आक्रमक ; आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या समोरील अरूअप्पा जोशी मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे राज्य उभे राहिले आहे. गेली काही वर्षे हा रस्ता दरवर्षी असाच खड्डेमय असतो; परंतु प्रशासनाचे मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या विरोधात अभाविपने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी त्रस्त होत आहेत. खड्ड्यातील चिखलाचे पाणी विद्यार्थ्यांच्या कपड्यावर उडते आणि वर्गामध्ये बसावे लागते. रस्ता चिखलाने व्यापलेला असल्याने विद्यार्थ्यांना चालायलासुद्धा जागा उरलेली नाही. हा रस्ता रत्नागिरी नगरपालिका हद्दीत असून, पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) दक्षिण रत्नागिरीच्यावतीने उपमुख्याधिकारी यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निवेदन देण्यात आले. या वेळी सात दिवसात रस्त्याच्या डागडुजीबद्दल निर्णय नाही घेण्यात आला तर अभाविपकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
--