Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Donald Trump Announcement : ही घोषणा करत ट्रम्प यांनी या दोन्ही देशांना एक इशाराही दिला आहे ; जाणून घ्या, भारतावरही काय होणार परिणाम?
U.S. President Donald Trump during a press briefing where he announced a 25% tariff on imports from Japan and South Korea, intensifying global trade tensions.
U.S. President Donald Trump during a press briefing where he announced a 25% tariff on imports from Japan and South Korea, intensifying global trade tensions. esakal
Updated on

Donald Trump announces tariff on Japan and South Korea : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज(सोमवार) जपान आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांना मोठा धक्का दिला आहे. कारण, आता १ ऑगस्टपासून जपान आणि दक्षिण कोरियामधून येणाऱ्या वस्तूंवर अमेरिका २५ टक्के टॅरिफ लावणार आहे. करवाढीची ही ताजी घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा ट्रम्प यांनी म्हटले होते की, ते आज अनेक देशांच्या नेत्यांना पत्रे पाठवणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी  त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर हा निर्णय जाहीर केला आहे. येथे त्यांनी प्रत्येक देशाच्या नेत्यांना पाठवलेल्या पत्रांच्या प्रती पोस्ट केल्या आहेत. तर आग्नेय आशियाई देशांना पाठवलेल्या पत्रांमध्ये ट्रम्प यांनी त्या देशांना असा इशाराही दिला आहे की,  त्यांनी आयात कर वाढवून प्रत्युत्तर देवू नये. अन्यथा, अमेरिकन प्रशासन आयात कर वाढवेल. याचा जपान आणि दक्षिण कोरियाच्या ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्यांग यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये म्हटले आहे की, "जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव तुमचे कर वाढवण्याचा निर्णय घेतला तर, तुम्ही ते ज्या संख्येत वाढवू इच्छिता, ते आमच्याकडून लादलेल्या २५ टक्के करमध्ये जोडले जाईल."

U.S. President Donald Trump during a press briefing where he announced a 25% tariff on imports from Japan and South Korea, intensifying global trade tensions.
Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

भारताला मंगळवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडून बहुप्रतिक्षित करवाढ पत्र मिळण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन द्विपक्षीय व्यापार करारावर सविस्तर वाटाघाटी करत आहेत. दोन्ही देशांमधील करार ९ जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी अंतिम केला जाईल. त्यानंतर, भारतावर २६ टक्के कर लादला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com