-rat४p७.jpg-
२५N७५१९५
मुंबई ः जनता हायस्कूलमधील शिक्षक रवींद्र कुरतडकर यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करताना मान्यवर.
-----------
रवींद्र कुरतडकरांचा सत्कार
पावस, ता. ७ ः मेर्वीचे सुपुत्र व आदर्श शिक्षक रवींद्र कुरतडकर यांचा निवृत्तीनिमित्त मुंबई येथील वरळी-कोळीवाडा येथे सदिच्छा समारंभ झाला. मुंबई येथील जनता हायस्कूलमधून ते सेवानिवृत्त झाले. या प्रसंगी जनता शिक्षणसंस्थेचे कार्यकारी मंडळ, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कुरतडकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले.