कोकण

अध्यापन सेवेतील ऋणानुंबध कायम

CD

75466

अध्यापन सेवेतील ऋणानुंबध कायम

ममता जाधव; आजगाव केंद्रातर्फे निवृत्तीनिमित्त सत्कार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः माझे बालपण कष्टात गेले. मात्र, इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर ध्येय गाठले. माझ्या करिअरची सुरुवात मालवण तालुक्यातील शिरवंडे येथे झाली. वर्षभरातच सावंतवाडी-आजगाव येथे नियुक्ती झाली. परिसरात ३६ वर्षे आजगाव, तिरोडा, शिरोडा आणि पुन्हा आजगाव असा त्रिकोण पूर्ण करून निवृत्त होत आहे. या काळात शाळा, संस्था, शिक्षक सहकारी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सदैव ऋणी राहीन, असे प्रतिपादन आजगाव केंद्राच्या निवृत्त मुख्याध्यापिका ममता जाधव यांनी केले.
आजगाव केंद्रीय स्तरीय शिक्षण परिषदेत आजगाव केंद्राच्या निवृत्त मुख्याध्यापिका सौ. जाधव यांचा केंद्रातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर केंद्रप्रमुख शिवाजी गावित, सत्कारमूर्ती ममता जाधव, नाणोस मुख्याध्यापक प्रशांत परब, तिरोडा मुख्याध्यापक जनार्दन प्रभूआजगावकर, धाकोरा मुख्याध्यापिका प्रियांका आजगावकर आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रभारी मुख्याध्यापक दत्तगुरु कांबळी यांनी सौ. जाधव यांच्या सेवेचा आढावा घेतला. मानसी परुळेकर-कदम, काव्या साळवी-कुवळेकर, सुनील गाड, प्रवीण तांडेल, दीपाली केदार, आदींनी जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सौ. जाधव यांचा केंद्रप्रमुख गावित यांच्या हस्ते सन्मान केला. अध्यक्ष गावित यांनी सौ. जाधव यांची सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची पद्धत, अपार कष्ट करण्याची जिद्द व मनमिळावू स्वभाव याचा गौरव करून त्यांच्यामुळे आजगाव केंद्राचे काम सुरळी सुरू होते, असे स्पष्ट केले. त्यांच्या अनुपस्थितीची उणीव भासेल, असे सांगून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रवीण तांडेल यांनी आभार मानले. यापूर्वी केंद्रशाळा आजगाव नंबर एकमध्ये शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच आदींनीही सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario ODI WC : पाकिस्तानी संघावर टीम इंडियाच्या हाता पाया पडण्याची वेळ; तीन सामन्यांत उतरला सर्व माज...

Shocking Crime in Sangli : सांगलीत नेमकं काय सुरू आहे?, तरुणीस जबदरस्तीने दुचाकीवर बसवून जंगलात नेलं अन्; तरूणाने नको ते केलं

Latest Marathi News Live Update : पन्हाळगडच्या पायथ्याला मृतावस्थेत आढळला बिबट्या

Maharashtra electricity strike : राज्यात अंधाराचे संकट! खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा ७२ तासांचा संप

Nobel Prize in Chemistry 2025: पॅलेस्टाईन रिफ्यूजी ते केमिस्ट्री नोबेल विनरपर्यंतचा प्रवास..Omar Yaghi यांची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

SCROLL FOR NEXT