कोकण

जिल्ह्यातील रुग्णांना आधार

CD

75669

जिल्ह्यातील रुग्णांना आधार

सावंतवाडीतील ‘यशराज’मध्ये शासनाच्या दोन योजना

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः येथील यशराज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचा प्रारंभ माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. यावेळी गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी डॉ. राजेश नवांगुळ करत असलेली धडपड कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
येथील यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने आजवर जिल्ह्यातील जनतेला आधुनिक आरोग्य सेवा पुरवत रूग्णांना सेवा दिली आहे. आता एकत्रीत आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू झाल्या आहेत. श्री. केसरकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. शिवसेना नेते अशोक दळवी, डॉ. मिलिंद खानोलकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, म.फुले योजनेचे डॉ. प्रवीण गोरूले, डॉ. संदीप सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. केसरकर म्हणाले, ‘‘आजारपणात शासनाच्या योजना फायद्याच्या ठरतात. सरकारने १०० टक्के लोकांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात प्रभावीपणे ही योजना लागू आहे. गरिब रुग्णांची सेवा डॉ. नवांगुळ यांच्या माध्यमातून होणार आहे. सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटीसाठी निधी मंजूर असताना तांत्रिक बाबतीत अडले आहे. या संदर्भात राजघराण्याची भेट घेतली आहे. डॉक्टरांची नियुक्ती करूनही ते इथे यायला बघत नाहीत. इथला परिसर किती सुंदर आहे याची कल्पना त्यांना नसते. यासाठी पाठपुरावा केला जात आहे. तसेच टेस्टट्यूब बेबी सारखी संकल्पना डॉ. नवांगुळ यांनी सावंतवाडीत उपलब्ध करून दिली आहे. महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्यात.’’
डॉ. नवांगुळ म्हणाले, ‘‘ही योजना आमच्या हॉस्पिटलला मिळण्यासाठी श्री. केसरकर यांच्यांसह इतरांनी विशेष प्रयत्न केले. आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्याकडे त्यांनी पत्र दिल्यानंतर ही मंजूरी मिळाली‌. ही योजना येथील लोकांसाठी फार महत्त्वाची आहे. मोठ्या शस्त्रक्रिया आता शक्य होणार आहेत. याप्रसंगी माजी नगरसेवक उमाकांत वारंग, डॉ. गोविंद जाधव, डॉ.‌ संजय दळवी, डॉ. धीरज सावंत, डॉ. विनय निर्मल, डॉ. विकास बर्वे, डॉ. सूरज देस्कर, सौ.मनिषा नवांगुळ, डॉ. राजशेखर कार्लेकर, सौ. पार्सेकर आदी उपस्थित होते. योजनेचे सिंधुदुर्ग समन्वयक डॉ. प्रवीण गोरूले यांनी आभार मानले.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT