
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅममध्ये दुसऱ्या कसोटीत ३३६ धावांनी विजय मिळवला. हा भारताचा बर्मिंगहॅममधील पहिलाच विजय ठरला. या ऐतिहासिक विजयानंतर लगेचच भारताला इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीला लागावे लागणार आहे.
१० जुलैपासून क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही, याबाबत भारताचा कर्णधार शुभमन गिलने अपडेट दिले आहेत.