कोकण

सावंतवाडीनगरी विठुनामाने दुमदुमली

CD

75673

सावंतवाडीनगरी विठुनामाने दुमदुमली

आषाढी एकादशी; प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात धार्मिक कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः प्रतिपंढरपूर सावंतवाडीत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे काकड आरती, विठ्ठल-रखुमाईला दह्या-दुधाचे स्नान घालून सोहळ्यास प्रारंभ झाला. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. दिवसभर विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांची मांदियाळी विठ्ठल मंदिरात होती. विठुनामात सावंतवाडीनगरी दुमदुमून गेली.
प्रतिपंढरपूर मानले जाणाऱ्या सावंतवाडी विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी स्नान पूजेचा मान यंदा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सौ. संजना परब यांना प्राप्त झाला. कन्या वैष्णवी परब उपस्थित होती. पहाटे काकड आरतीने उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर विठ्ठल-रखुमाईला दह्या-दुधाचा स्नान विधी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पार पडला. सकाळपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी मंदिरात केली होती. दुपारी अभंग, भक्तिगीत, भजनाचे कार्यक्रम झाले. सायंकाळी कीर्तन सेवा व अभंग गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार केसरकर म्हणाले, ‘‘विठ्ठलाचा आशीर्वाद सावंतवाडी शहरावर आहे. या मंदिराला ३०० वर्षे झाली आहेत. पंढरपूरला दर्शन घेऊन आज सावंतवाडीत दर्शनासाठी उपस्थित राहिलो. अनेक लोक भक्तिभावाने येतात. भाऊ मसुरकर यांनी भक्तिमार्ग दाखविला. हाच वारसा पुढे घेऊन जात आहेत. विठ्ठलाचा नामजप अखंड केला जात आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : ना स्टेज...ना क्लब...पॅराग्लायडिंग करताना महिलेने वाजवला DJ...व्हिडीओ बघून तुम्हीही थक्क व्हाल!

Gautam Gambhir दुतोंडी! माजी सहकाऱ्याने IND vs PAK लढतीवरून टीम इंडियाच्या कोचला धरले धारेवर

Pune News : भाविकांना शिळे अन्नपदार्थ देऊ नका; ‘एफडीए’ च्‍या गणेश मंडळांना सूचना

Night Signs of Liver Damage: 'ही' 5 लक्षणे फक्त रात्री दिसतात ; दुर्लक्ष केल्यास यकृतावर होऊ शकतात वाईट परिणाम

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज! समाजमाध्यमांवर करडी नजर, विसर्जन स्थळांची पाहणी

SCROLL FOR NEXT