Mumbai Police: गणेश उत्सव काही तासाभरावर येऊन ठेपला असून या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव शांततेत व सुरक्षिततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.
अंबरनाथ : आगामी गणेशोत्सव शांततेत व सुरक्षिततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी नुकताच अंबरनाथ शहराचा पाहणी दौरा करून विविध मंडळे, विसर्जन स्थळे तसेच सीसीटीव्ही व्यवस्थेची माहिती घेतली.