75803
मुरकरांनी साकारला
तुळशीपत्रावर पांडुरंग
बांदा : आषाढी एकादशीच्या औचित्याने मळेवाड येथील प्रसिद्ध चित्रकार मदन मुरकर यांनी आपल्या कलेचा एक अनोखा अविष्कार सादर केला आहे. त्यांनी चक्क तुळशीच्या छोट्या पानावर विठ्ठलाची अप्रतिम प्रतिकृती साकारली आहे. त्यांच्या या कला कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुरकर हे एक उत्तम आणि नावाजलेले चित्रकार आहेत. त्यांच्या या कल्पकतेचे आणि प्रतिभेचे दर्शन घडविणारी ही कलाकृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.