कोकण

आजी-आजोबांना पंढरीच्या वारीची अनुभूती

CD

75985

आजी-आजोबांना पंढरीच्या वारीची अनुभूती

दिविजा वृद्धाश्रमात आषाढी एकादशी; पथनाट्यासह रंगले विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ७ : असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला. आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आजी-आजोबांनी वारकरी वेशभूषा परिधान करून हरिनामाचा जयघोष केला.
यावेळी आश्रमातील आजी-आजोबांनी विविध संत वेशभूषा केल्या. विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची पारंपरिक पद्धतीने पूजा केली. आश्रमाचे खजिनदार अविनाश फाटक यांच्या संकल्पनेला संचालक संदेश शेट्ये यांनी सहकार्य करत हा उत्सव साजरा केला. या उत्सवामुळे अवघे पंढरपूर दिविजा वृद्धाश्रमात अवतरले. त्यामुळे वयोमानामुळे थकलेल्या आजी-आजोबांना पंढरपूरच्या वारीची अनुभूती मिळाली. मैथिली फाटक यांनी आपल्या ओशिवरा माणिकजी मनपा शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांना घेऊन पंढरपूर वारीचे सुंदर पथनाट्य सादर केले.
आश्रमातील आजींनी नऊवारी साड्या तर आजोबांनी गळ्यात तुळशीमाळा, कपाळी कस्तुरी टिळा लावून कार्यक्रमाला आगळी शोभा आणली. महिला कर्मचाऱ्यांनी भजन व पुरुष कर्मचाऱ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. शिक्षक पद्माकर सावे यांनी वासुदेवाची भूमिका साकारली. या कार्यक्रमात फोंडा शाळेतील शिक्षक दत्तगुरू चव्हाण यांना आजी-आजोबांनी वाचलेली १०० पुस्तके शालेय विद्यार्थांना वाचनालयासाठी भेट दिली. यानंतर दिंडीचा कार्यक्रम झाला. उद्योगपती परिणीता व उल्हास फाटक यांनी दिंडीच्या कार्यक्रमात भाग घेतला. संदेश शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन अश्विनी पटकारे, सायली तांबे, अस्मी राणे, अमृता इंदप, ऋतुजा इंदप, समीर मिठबावकर यांनी केले. सखाराम कोकरे, महादेव हुंबे, सुनील इंदप, प्रवीण डामरे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : देवदेवतांच्या नावावर आम्हाला त्रास, सणासुदीत हिंदूंचीच अडवणूक का? मुंबईला निघण्याआधी जरांगेंचा मोदी-शहांना सवाल

Pune Ganpati 2025 : महापालिकेचे यंदाही पर्यावरणपूरक उपक्रम; मूर्तिदान संकल्पना, खतनिर्मिती अन् शाडूमातीच्या पुनर्वापरावर भर

Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' 10 खास गोष्टी, घरात पसरेल आनंदाची लाट

Latest Maharashtra News Updates : चिंचपोकळीच्या गणपतीची विधिवत पूजा

Weightlifting: वेटलिफ्टिंगमध्ये यश खंडागळेला सुवर्ण; राष्ट्रकुल चॅम्पियनशिप,६५ किलो वजनी गटात विक्रम

SCROLL FOR NEXT