कोकण

महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

CD

- rat८p४.jpg -
२५N७६१३१
भिंगळोली: महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
---
महामार्गावरील खड्डे बुजवणे सुरू
आंबडवे-लोणंद; राष्ट्रवादीच्या निवेदनानंतर यंत्रणेला जाग
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ८ : आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर जून महिन्यात पावसामुळे पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदाराने कालपासून (ता. ७) सुरुवात केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.
आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील गतवर्षीचे बांधकाम अपूर्ण राहिले होते. त्यामुळे पावसात खड्ड्यांसह अन्य विविध समस्यांना वाहनचालकांना सामोरे जावे लागत होते. तालुकावासियांच्या अडचणीत पावसाच्या आपत्तकालीन परिस्थितीची भर पडली होती. म्हाप्रळ ते मंडणगड या दोन गावांच्या हद्दीतील १८ किलोमीटर लांबीच्या अंतरात असलेल्या खड्ड्यांमध्ये ९ जुलै रोजी वृक्षारोपण करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देण्यात आला होता. तसे निवेदनही प्रशासनाला दिले होते. या निवेदनाची दखल स्थानिक तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी तातडीने घेतली. प्राधिकरण तसेच ठेकेदार यांच्याशी चर्चा करून तातडीने खड्डे बुजवण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार आणि तालुकावासियांची अडचण लक्षात घेऊन संबंधित यंत्रणेने खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने यंत्रणेला जाग आल्यामुळे तालुकावासियांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, केवळ मंडणगड ते म्हाप्रळ या अंतराबरोबर मंडणगड ते आंबडवे या अंतरातील खड्डेही पूर्णपणे बुजवून रस्ता वाहतुकीयोग्यतेचा करावा, अशी मागणी तालुकावासियांमधून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT