कोकण

कोयना, चांदोलीतील ३ वाघ रत्नागिरी जिल्ह्यात

CD

( वाघाचा संग्रहित फोटो वापरणे)
कोयना, चांदोली भागातील तीन वाघ रत्नागिरी जिल्ह्यात
वनविभागाची माहिती ; चौथ्या वाघाचा आढळ कोळकेवाडी तळसरात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ : पूर्वी सह्याद्रीच्या राधानगरी पट्ट्यात आणि सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात दिसणारे वाघ आता कोकणातही दिसत आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या खोऱ्यात वाघांच्या डरकाळ्या मागील १५ वर्षांच्या प्रयत्नांनी घुमू लागल्या आहेत. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील वाघांचा भ्रमंती मार्ग रत्नागिरी जिल्ह्यात असल्याचे वनविभागाने सांगितले. वनविभागाकडून लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चार वाघांचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे. त्यातील तीन वाघ हे कोयना आणि चांदोलीतून येतात तर चौथा वाघ कोळकेवाडी तळसर येथील जंगलात आढळतो. त्यामुळे भ्रमण मार्गावर विकासकामे करताना वन्यजीव संरक्षणाच्या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट आणि वनविभागाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे केलेल्या मोजणीनुसार कोकण ते चांदोली अभयारण्याच्या पट्ट्यात चार वाघ असल्याचे निश्चित झाले आहे. पश्चिम घाटातील वाघांचे अस्तित्व कमी होत आहे, असे म्हटले जात असतानाच या नोंदी सकारात्मक मानल्या जात आहेत. सह्याद्रीच्या खोऱ्यात शिकार आणि सुरक्षित अधिवास नसल्याने वाघांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. ही संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ५ जानेवारी २०१० ला सह्याद्री व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. त्याचे क्षेत्रफळ ११६५.५७ चौरस किलोमीटर आहे. त्यात ६००.१२ चौरस किलोमीटरचे मुख्य क्षेत्र आणि ५६५.४५ चौरस किलोमीटरचे बफर क्षेत्र आहे. वाघांच्या संरक्षणासोबतच इतर वन्यजीव आणि वनस्पती संवर्धनासाठी सह्याद्री व्याघ्रप्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पात वाघ, बिबटे, गवा, चितळ, सांबर आणि हरीण यासारखे प्राणी आढळतात.
२०१७ पासून ‘टायगर रिकव्हरी प्रोग्रॅम’ सुरू करण्यात आला. त्याचा पहिला टप्पा २०२०-२१ अखेर सुरू झाला. त्यात वाघाचे भक्ष्य असणारे तृणभक्षी प्राणी वाढवण्यावर भर दिला गेला तसेच वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मदतीने कॅमेरा ट्रॅपिंग सुरू केले. प्री-ऑग्मेंटेशनमध्ये (पूर्व संवर्धन) गवती कुरणांची संख्या वाढवणे, पाणवठ्यांची सोय करणे यावर भर दिला गेला. त्यामुळे तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढली आणि वाघांची संख्या वाढण्यास मदत होत आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात चार वाघांबरोबरच सहा ब्लॅकपँथरही आहेत. तसेच वानर व माकडांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे वनविभाकडून सांगण्यात आले.

चौकट
कोकणात वाघांची नोंद
वाघ केवळ शिकार किंवा अस्तित्वाच्या चिन्हांवरून मोजले जात होते. त्यामुळे नक्की संख्या किती, हे मोजण्यासाठी त्या संपूर्ण कॉरिडोअरमध्ये कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. त्यात दोडामार्ग, आंबोली आणि चांदोली या परिसरात वाघांचा वावर असल्याचे लक्षात आले. आता या वाघांचा वावर रत्नागिरी जिल्ह्यातही असल्याचे कॅमेराट्रॅपवरून पुढे आले आहे.
---
कोट
पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेत सह्याद्री व्याघ्रप्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. येथे वाघांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या अधिवासासाठी काम केले जाते. वाघांचा भ्रमणमार्गाचा जो पट्टा आहे तो काली येथून सह्याद्रीपर्यंत आहे. या भागात शेती, रस्ते अशी कामे होत असतात. ती पूर्णपणे थांबवू शकत नाही; मात्र ती कामे करताना वन्यजीव संरक्षणाच्या गोष्टी कराव्या लागतील. त्या दृष्टीने विकास करणे आणि आराखडे बनवावे लागतील.
- गिरिजा देसाई, विभागीय वनाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

SCROLL FOR NEXT