कोकण

सदर-तुमचं डिव्हाईस सायबर गुन्हेगारासाठीही काम करतंय

CD

सावध ऐका सायबरच्या हाका............ लोगो

आजकाल इंटरनेट ही एक मूलभूत गरज झाली आहे; पण माणूस त्याच्या इतका आहारी गेला आहे की, एखाद्या ठिकाणी इंटरनेट नसेल तर तो वेडापिसा होतो आणि त्यातूनच कधीतरी इंटरनेट मिळेल, या आशेने स्वतःच्या मोबाईलचे इंटरनेट चालूच ठेवतो. तसेच ‘आता काय प्रत्येकाकडेच इंटरनेट आहे, मग तो माझे इंटरनेट कशाला वापरेल?’ अशा भावनेने किंवा ‘माझा अमर्यादित पॅक आहे, कोणी वापरले तर काय होते?’, अशा परोपकारी वृत्तीने इंटरनेटला पासवर्ड न ठेवता ते चालूच ठेवतो. अशा भाबड्या लोकांना ते सुरू असण्याचा तोटा माहिती नसतो. कल्पना करा की, तुम्ही घरी बसून तुमचा संगणक किंवा मोबाईल वापरत आहात, इंटरनेटवर व्हिडिओ पाहताय, काम करताय; पण, तुम्हाला कल्पना नसताना तुमचं डिव्हाईस कुठल्याशा सायबर गुन्हेगारासाठी काम करतंय तेही तुमच्याच इंटरनेटचा वापर करून! हेच आहे बॉटनेट हल्ला. हे सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेऊया..

-rat१२p२२.
25N77041
- डॉ. प्रतीक ओक
घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयएमएल विभाग), लवेल
----
तुमचं डिव्हाईस सायबर
गुन्हेगारासाठीही काम करतंय
बॉटनेट म्हणजे काय? बॉटनेट हा दोन शब्दांचा मिलाफ आहे. ‘बॉट’(Bot) म्हणजे स्वयंचलित संगणकीय प्रोग्राम आणि ‘नेट’ (Net) म्हणजे नेटवर्क. बॉटनेट म्हणजे ‘रोबोट नेटवर्क’ म्हणजेच अशा संगणकांचा किंवा स्मार्टफोनचा एक गट जो एखाद्या सायबर गुन्हेगाराच्या नियंत्रणात आहे. हॅकर एका विशिष्ट सॉफ्टवेअर किंवा व्हायरसच्या मदतीने अनेक डिव्हाइसेसवर नियंत्रण मिळवतो आणि त्यांचा गैरवापर करतो. विशेष म्हणजे डिव्हाईसचा मालक याची खबरही घेत नाही!

साधारण प्रक्रिया
संसर्ग (इन्फेक्शन) : हॅकर एखाद्या लिंकवर क्लिक करायला लावतो किंवा एखादा व्हायरस असलेली फाईल डाउनलोड करायला भाग पाडतो. त्यामुळे तुमच्या डिव्हाईसवर मालवेअर (धोकादायक सॉफ्टवेअर) येतो. बॉटनेटचं काम म्हणजे स्वतः वाढत राहणं. एकदा लागलेलं डिव्हाइस इतर डिव्हाइसेसना संसर्ग करतं.
नियंत्रण (कंट्रोल) : तुमचं डिव्हाईस हॅकरच्या नियंत्रणात जातं. ते ‘बॉट’ म्हणजेच एक गुलाम डिव्हाईस बनतं.
हल्ला (अॅटॅक) : हल्लेखोर अशा हजारो बॉट्सना एकाचवेळी कामाला लावतो. एखादं वेबसाइट डाऊन करायला, माहिती चोरण्यासाठी किंवा इतर हल्ल्यांसाठी.
बॉटनेटचा वापर खालील गोष्टींसाठी होतो.
१) डी डॉस हल्ले : वेबसाइटवर इतकी ट्रॅफिक पाठवतात की, ती बंद पडते.
२) डाटा चोरणं : पासवर्ड, बँक माहिती चोरणं
३) स्पॅम मेल्स : लाखो जाहिरातीसदृश ई-मेल पाठवणं.
४) मालवेअर पसरवणं : आणखी डिव्हाईसना संसर्ग होण्यासाठी.
५) क्रिप्टोकरन्सी माइनिंग : तुमच्या डिव्हाईसचा वापर करून डिजिटल पैसे कमवणं.

एक दुर्दैवी घटना – मिराय बॉटनेट
२०१६ मध्ये मिराय नावाच्या बॉटनेटने लाखो स्मार्ट डिव्हाईसेस जसे की, कॅमेरे आणि वायफाय राउटर्स ताब्यात घेतले. नंतर त्यांनी एकाचवेळी मोठ्या वेबसाइट्सवर हल्ला केला जसे की, ट्विटर, नेटफ्लिक्स, Reddit आणि त्या वेबसाइट्स काही काळासाठी बंद पडल्या. मिराईने (Mirai) अशा उपकरणांचा शोध घेतला जे इंटरनेटला जोडलेले होते; पण ज्यांचे पासवर्ड डीफॉल्ट (default) होते (उदा. ‘admin’, ‘१२३४’). एकदा उपकरण सापडलं की, त्यात मालवेअर इन्स्टॉल केलं गेलं, जे त्या डिव्हाईसला बॉटमध्ये रूपांतरित करतं. हॅकरने सर्व बॉट्सना एका सेंट्रल सर्व्हरवरून आदेश दिले ‘या वेबसाइटवर ट्राफिक पाठवा!’
या हल्ल्याचा बचाव खालील पद्धतीने करता येतो.
अँटिव्हायरस वापरा, सॉफ्टवेअर अपडेट ठेवा, शंका असलेली लिंक ओपन करू नका, वायफाय सुरक्षित ठेवा, न वापरता येणारी डिव्हाइसेस बंद ठेवा.
बॉटनेट हल्ला म्हणजे एक लपवलेलं सायबर युद्ध. तुमचं डिव्हाईसदेखील त्यात सहभागी असू शकतं, तुम्हाला माहितीही नसेल. त्यामुळे सावध राहा, सजग राहा आणि डिजिटल जगात सुरक्षित राहा.

(लेखक एआयएमएल (AIML) विभाग, घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय, लवेल येथे प्राध्यापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT