कोकण

‘कथक’, ‘भरतनाट्यम’मधून यश मिळवूया

CD

77282

‘कथक’, ‘भरतनाट्यम’मधून यश मिळवूया

महेश सावंत; कुडाळमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः आपल्या लाल मातीतील कथक, भरतनाट्यम कला एकत्र घेऊन या कलेची बुद्धिमत्ता वर्ल्ड एक्सलंड रेकॉर्डच्या माध्यमातून जगासमोर दाखवूया, असे प्रतिपादन पखवाज अलंकार महेश सावंत यांनी येथे केले. येथील सिद्धाई डान्स ॲकॅडमीच्या भरतनाट्यम परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
सिद्धाई डान्स ॲकॅडमीच्या माध्यमातून झालेल्या भरतनाट्यम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा येथील मराठा समाजाच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नुपूर कला केंद्र देवगडच्या संचालिका अनुजा गांधी, अजय सावंत, सिद्धाई डान्स ॲकॅडमीच्या संचालिका कविता राऊळ, सामाजिक कार्यकर्ते मोहन राऊळ, सामाजिक कार्यकर्त्या अदिती सावंत, नृत्य दिग्दर्शक सागर सारंग, अमित उमळकर, समृद्धी ठाकूर, दिप्ती ढवण, अक्षता सावंत, इंद्रजीत माने, आबा आईर आदी उपस्थित होते.
श्री. सावंत म्हणाले, ‘‘आपल्या गावासह जिल्ह्याचे नाव आपण आपल्या कला क्षेत्रात कसे पुढे नेता येईल? याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. आपल्या गुरुवर्यांना कधीही विसरू नका. आई-वडिलांनंतर गुरु हे आपले मार्गदर्शक असतात. त्यांचा आशीर्वाद मोलाचा असतो. कथक व भरतनाट्यम नृत्य कला घेऊन लवकरच वर्ल्ड एक्सलंड रेकॉर्ड करूया की जेणेकरून आपल्या कोकणच्या लाल मातीतील ही बुद्धिमत्ता जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न करूया.’’ श्रीमती गांधी यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाबरोबरच कोणतीही कला अवगत करणे महत्त्वाचे आहे. कलेतूनच तुम्ही भविष्यात विविध स्वप्ने पाहू शकतात. आजच्या स्पर्धात्मक युगात आपण अनेक खेळांपासून खूप  दूर होत चाललो आहोत. त्या खेळांकडे पुन्हा या आणि मोबाईलपासून लांब राहा, असे सांगितले. सिद्धाई ॲकॅडमीची भरतनाट्यममध्ये कथक विशारद ठरलेली जान्हवी ठाकूर तसेच भरतनाट्यम परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. दिप्ती ढवण यांनी निवेदन केले. संचालिका कविता राऊळ यांनी स्वागत केले.
----------------
गुणवंत नृत्यांगणा
शिवज्ञा भोगटे, प्रज्ञा पारकर, प्रिशा नारकर, आरोही कराड, कनिष्का सावंत, आराध्या सावंत, सिमर गावडे, वीरा कुपेकर,  काव्या सावंत, रिया करलकर, सौम्या करलकर, खुशी नाईक, गोजिरी सुर्वे, शिवण्या लाड, दुर्वी पारसेकर, सोहा गावडे, निलक्षी कदम, कादंबरी कदम, भक्ती सावंत, ऋषिका नेरुरकर, फाल्गुनी तानावडे, वरदा परब, श्रावणी कोरगावकर, किमया बांबुळकर, जाई आंबेकर, कृतिका कुडाळकर, तन्वी गुंजाळ, आयुषी केळुसकर, हर्षा बावलेकर, सिद्धी गावडे, मनस्वी तेंडुलकर, युक्ता सापळे, पूर्वा माळकर, आस्था सावंत, आर्या सावंत, श्रेया सावंत, जान्हवी ठाकूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girl Video : गरिबीचा शाप! रस्त्यावर फुलं विकणाऱ्या चिमुरडीसोबत रिक्षा चालकानं केलं घाणेरडं कृत्य, हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल..

Pune Weather Update: दोन दिवसांनंतर पावसाची उघडीप; आज-उद्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज

Gold Rate Today : सोने खरेदीचा विचार करत आहात? आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भावात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग...

तुम्हालाही समोसा, जिलेबी खायला आवडते? मग थांबा, कारण सरकार लठ्ठपणाविरोधात आखतंय नवा प्लॅन

Mumbai Indians ने जिंकले १३ वे विजेतेपद! अंतिम सामन्यात मॅक्सवेलच्या संघाला चारली धूळ; रुशील उगारकर ठरला हिरो

SCROLL FOR NEXT