कोकण

-कशेडी घाटात लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

CD

-rat१४p१४.jpg-
P२५N७७४४३
खेड ः कशेडी घाटात सुरक्षेसाठी बसवण्यात येत असलेल्या लोखंडी जाळ्या.
----------------
कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’
दरड कोसळण्यास प्रतिबंध; पावसाळ्यात महामार्ग सुरक्षित
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १४ : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी घाटातील दरडी कोसळण्याच्या समस्येवर प्रशासनाने उपाययोजना सुरू केली आहे. घाटातील डोंगर कापलेल्या धोकादायक भागांवर मजबूत लोखंडी जाळी बसवण्यात येत आहे. या ‘सुरक्षा कवचा’मुळे पावसाळ्यात कोसळणारे दगड आणि माती थेट महामार्गावर येण्यापासून रोखली जाणार असून, प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
कशेडी घाट दरड कोसळण्यासाठी २००५ पासून कुप्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात या ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे आणि अपघात घडण्याचे प्रकार सातत्याने घडत आले आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात डोंगर कापण्यात आल्याने दरडींचा धोका काही प्रमाणात कमी झाला असला तरीही, कापलेल्या डोंगराच्या उतारांवरून माती आणि दगड खाली घसरण्याचा नवीन धोका निर्माण झाला होता. पावसाळ्यामध्ये डोंगरउतारावरून पाणी वेगाने पायथ्याकडे वाहत येते. या पाण्याबरोबर माती, दगड रस्त्यावर पडतात. त्यामुळे अनेकवेळा वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या घाटातील चोळई आणि धामणदेवी-भोगाव या सर्वाधिक दरडप्रवण क्षेत्रांमध्ये हे काम वेगाने सुरू आहे. या तंत्रज्ञानानुसार, कापलेल्या डोंगराच्या उतारावर मजबूत पोलादी जाळी घट्ट बसवली जाते. यामुळे पावसाच्या पाण्यामुळे सैल होणारी माती आणि लहान-मोठे दगड या जाळीतच अडकून राहतात आणि थेट रस्त्यावर येत नाहीत. यामुळे महामार्ग सुरक्षित राहण्यास मदत होते. हे तंत्र कोकण रेल्वेमार्गावर ठिकठिकाणी वापरण्यात आले असून, ते यशस्वी झाले आहे.

प्रवाशांमधून समाधान
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना, विशेषतः पावसाळ्यात, दरड कोसळण्याच्या भीतीने वाहनचालक आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता; मात्र, आता या सुरक्षाजाळीच्या कामामुळे त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याची भावना निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून स्वागत होत असून, समाधान व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, चिंचपोकळीचा चिंतामणीही मार्गस्थ

Govinda Komkar : वनराजच्या अंत्यविधीलाच टोळीनं घेतलेली शपथ, १९ वर्षीय मुलाला गोळ्या घातल्या; नाना पेठेत काय घडलं?

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : कल्याणमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरली

SCROLL FOR NEXT